रेमिडेसिव्हर इंजेक्शनसाठी कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांची पिळवणूक, चंद्रकांत पाटील यांचे राजेश टोपे यांना पत्र

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. कोरोनाच्या उपचारात उपयोगी ठरणारं हे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना 10 टक्के नफा घेऊन विकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे ही पिळवणूक तातडीने थांबवावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्यांनी याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे.Chandrakant Patil’s letter to Rajesh Tope, extortion of relatives of corona victims for remediesiver


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. कोरोनाच्या उपचारात उपयोगी ठरणारं हे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना 10 टक्के नफा घेऊन विकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन होताना दिसत नाही.रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे ही पिळवणूक तातडीने थांबवावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्यांनी याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे.

पाटील म्हणाले, मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यानंतरच्या काही महिन्यात रेमिडेसिव्हर या इंजेक्शनची मागणी एकदमच वाढल्याने याचा तुटवडा निर्माण झाला. हे इंजेक्शन महाग असल्यानं नंतर याची किमत कमीही करण्यात आली.

मात्र, आता कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे रेमडिसिव्हर इंजेक्शन बाजारात उपलब्ध आहे. अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना 10 टक्के नफा घेऊन विकण्याचा आदेश दिला आहे. मात्र, कंपनीच्या मूळ किंमतीपेक्षा विक्रीची किंमत चार ते पाच पटीने जास्त असल्याचं दिसून येत आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमिडेसिव्हर या इंजेक्शनचे 6 इंजेक्शनचे डोस द्यावे लागतात. या इंजेक्शनच्या 6 डोसची किंमत 30 ते 32 हजार दरम्यान होते. शासनाचा आदेश पाळण्यावर कुठलीही देखरेख नाही. त्यामुळे रुग्णांची पिळवणूक होत आहे. कंपनीने एका इंजेक्शनवर 5 इंजेक्शन मोफत द्यावेत किंवा दर कमी करावी म्हणजे रुग्णांची होणारी पिळवणूक थांबेल.

Chandrakant Patil’s letter to Rajesh Tope, extortion of relatives of relatives for remediesiver

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*