कोरोना लस निर्मितीचा वेग मंदावणार, अमेरिका, युरोपने कच्चा माल रोखला ; सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांची माहिती


वृत्तसंस्था

पुणे : कोरोना लसीच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा देशात तुटवडा जाणवू लागला आहे. अमेरिका आणि युरोपने लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्चा मालाचा पुरवठा रोखला आहे. त्यामुळे लस निर्मितीचा वेग मंदावू शकतो, अशी माहिती सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांनी दिली. To slow down corona vaccine production

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार कोविशिल्ड या कोरोना लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे.



अमेरिका आणि युरोपमधून कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र, त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सीरमला कच्चा माल मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे”, असं अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे.

लस पूरवठ्याबाबत राज्यांची ओरड

देशात राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. त्यामुळे लसींची मागणी वाढली आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी लसींचा आवश्यक तेवढा पुरवठा केंद्राकडून मिळत नसल्याची तक्रारही केली. त्यामुळे लसींची मागणी अजून वाढणार आहे. पर्यायाने लस निर्मितीसाठी कच्च्या मालाची कमतरता भासणं ही चिंतेची बाब आहे.

…तर अमेरिकेत आंदोलन केलं असते

“मला शक्य असतं तर मी अमेरिकेत गेलो असतो आणि अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं असतं. त्यांना सांगितलं असतं की तुम्ही फार महत्त्वाचा असा कच्चा माल रोखून धरला आहे. भारतातीलच नाही, तर जगभरातील करोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांसाठी हा कच्चा माल आवश्यक आहे”, असं अदर पूनावाला म्हणाले.

कच्चा माल आताच हवा

लसीसाठीचा कच्चा माल आता हवा आहे. ६ महिने किंवा वर्षभरानंतर त्याची आवश्यकता नसेल. कारण तोपर्यंत दुसऱ्या पुरवठादाराकडून तो माल मिळवण्याची व्यवस्था केली असेल. पण, या घडीला अमेरिका आणि युरोपकडून येणाऱ्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे, असं पूनावाला यांनी स्पष्ट केले.

चीनकडून कच्चा माल घेणार नाही

दरम्यान, चीनकडून लसीसाठीचा कच्चा माल घेण्याच्या पर्यायाचा सीरम विचार करत नसल्याचं अदर पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे. चीनकडून येणाऱ्या मालाचा दर्जा आणि पुरवठ्यासंदर्भातले निर्बंध याचा विचार करता तो पर्याय विचारात घेतला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

महिन्याला 11 कोटी डोसचं लक्ष्य

सीरम इन्स्टिट्युटतर्फे Astrazeneca आणि Oxford यांच्यासोबत संयुक्तपणे Covishield लसीचं उत्पादन केलं जात आहे. सध्या महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचं उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये सुरू असून ते १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचं ध्येय या वर्षी जूनपर्यंत गाठण्याचा संकल्प असल्याचे अदर पूनावाला यांनी सांगितले.

To slow down corona vaccine production

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात