विशेष प्रतिनिधी
मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग नवव्यांदा रेपो दर चार टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, रिझर्व्ह बँक इतर बँकांकडून ज्या दराने कर्ज घेते त्या रिव्हर्स रेपो दरातही कोणताही बदल न करता तो ३.३५ टक्के कायम ठेवण्यात आला आहे.RBI unchanged its Repo rate
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. पतधोरण समितीने रेपो आणि रिव्हर्स रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय बहुमताने घेतल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना उपलब्ध होणारा कर्जपुरवठाही पूर्वीप्रमाणे ४.२५ टक्के दरानेच करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मे २०२० नंतर पतधोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ‘कोरोना संसर्गस्थिती आटोक्यात येत असल्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वािस वाढत आहे. त्यामुळे आर्थिक घडामोडी सकारात्मक दिशेने वाढत आहेत. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्यासाठी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही,’ असे दास यांनी सांगितले
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App