विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिगर बँकिंग वित्त संस्थांना कर्ज देणे आणि मोठ्या कर्जांचा डाटा ठेवणे यासंबंधी घालून देण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्यामुळे १४ बँकांना रिझर्व्ह बँकेने जबर दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.RBI fines 14 banks for breach of credit data rules
एका उद्योग समूहाला देण्यात आलेल्या कर्जाच्या खात्याची छाननी केल्यानंतर काही त्रुटी आढळून आल्या होत्या. यावरून ही कारवाई करण्यात आली. या उद्योग समूहाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, दंड ठोठावण्यात आलेल्या बँकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँकेने वाढलेल्या महागाईमुळे रेपो रेट 4% वर कायम ठेवला, ग्रोथ रेटचा अंदाज घटवला
यामध्ये बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑ फ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुसी, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करुर वैश्य बँक, पंजाब अँड सिंध बँक, साऊथ इंडिया बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जम्मू व काश्मीर बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App