पीएम केअर फंडावर रतन टाटा ट्रस्टी, सुधा मूर्ती सल्लागार; अन्य महनीय व्यक्तींच्याही नियुक्त्या


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधानांचा सेवा निधी पीएम केअर फंडावर प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांची विश्वस्त म्हणून, तर प्रख्यात लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती यांची सल्लागार मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा आणि सुधा मूर्ती यांच्याबरोबरच अनेक क्षेत्रातील मान्यवरांची पीएम केअर फंडावर ट्रस्टी आणि सल्लागार मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भारताचे माजी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल राजीव महर्षी, लोकसभेचे माजी उपसभापती करिया मुंडा, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस यांची ट्रस्टी म्हणून, तर टेक फॉर इंडियाचे सहसंस्थापक आनंद शाह यांची सल्लागार मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. Ratan Tata Trustee, Sudha Murthy Adviser on PM Care Fund

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवीन ट्रस्टींची आणि सल्लागार मंडळाची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. या बैठकीनंतर नव्या ट्रस्टींची आणि सल्लागार मंडळाची नियुक्ती केल्याची घोषणा सरकारने अधिकृतरित्या केली आहे.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व ट्रस्टचे आणि सल्लागार मंडळाचे स्वागत करून आभारही मानले आहेत. विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या मान्यवरांचा ट्रस्टींमध्ये समावेश झाल्यामुळे पीएम केअर फंडातून अधिक पारदर्शकपणे समाजाला मदत करता येईल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. पीएम केअर फंडातून कोरोना सारख्या महामारीच्या संकट काळात हजारो लोकांना लाभ झाला त्याचबरोबर
4345 लहान मुलांना देखील यातून मोठी मदत मिळाली. याविषयी नव्या ट्रस्टींनी आणि सल्लागार मंडळाने समाधान व्यक्त केले आहे.

पीएम केअर फंडाचा व्यापक दृष्टिकोनातून परिणामकारक कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल, आकस्मिक काळात आणि तणावाच्या स्थितीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पद्धतीने मदत पोहोचवता येईल, याचा विचार विनिमय बैठकीत सर्व ट्रस्टींनी केला.

पीएम केअर फंडातून समाजातल्या विविध घटकांना कोरोनाच्या संकट काळात अनेकविध मदत झाली असली तरी विरोधी पक्षांनी त्या फंडाविषयी आणि विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. रतन टाटा, सुधा मूर्ती तसेच अन्य मान्यवरांची पीएम केअर फंडाच्या ट्रस्टी आणि सल्लागार मंडळावर झालेली नियुक्ती या पार्श्वभूमीवर पारदर्शक कारभाराच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली आहे.

Ratan Tata Trustee, Sudha Murthy Adviser on PM Care Fund

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात