महापौर या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला दिली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


प्रतिनिधी

गांधीनगर : भाजपने आयोजित केलेल्या देशभरातील महापौर परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महापौरांना संबोधित केले आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात फडणवीस यांनी अतिशय तरुण वयात नगरसेवक आणि वयाच्या 27 व्या वर्षी महा नागपूरचे महापौर म्हणून केली या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी “महानगर प्रशासनात महापौरांची भूमिका” या फडणवीस यांनी गुजरातमधील राष्ट्रीय महापौर संमेलनात संबोधित केले.Freedom fighter Savarkar gifted the word mayor to the nation : Deputy Chief Minister Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापौर या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला दिली. महापालिका प्रशासनात महापौर आणि नगरसेवक हे अतिशय महत्वाचे घटक असतात. नरेंद्र मोदी यांनी सुशासनाचा रचलेला पाया, नव्याने नगरविकासाच्या तयार झालेल्या योजना, शहरी विकास हे आव्हान नाही, तर त्याकडे संधी म्हणून बघण्याची गरज, विकासात शहराच्या विकास आराखड्याची भूमिका, संसाधनांचा सुयोग्य वापर, हरित ऊर्जा, राजकीय इच्छाशक्ती, नावीन्यपूर्ण प्रयोग, शहरवासीयांशी सातत्याने संवाद अशा अनेक विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आणि विविध प्रश्नांना उत्तरे सुद्धा दिली.देशभरातील सुमारे 18 राज्यातील 125 हून अधिक महापौर या संमेलनात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या राष्ट्रीय महापौर संमेलनाला प्रारंभ झाला, तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या संमेलनाचे उदघाटन केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील, डॉ. विनय सहस्रबुद्धे, विजयाताई रहाटकर आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.

दोन दिवसांची ही परिषद असून त्यात आज विविध नेते आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र सरकारच्या महापालिकांसाठीच्या योजना, त्याची अंमलबजावणी, विविध महापालिकेतील यशस्वी योजनांचे सादरीकरण अशी अनेक सत्र या राष्ट्रीय महापौर संमेलनात होणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाने या संमेलनाचा समारोप होईल.

Freedom fighter Savarkar gifted the word mayor to the nation : Deputy Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था