वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती पदक जिंकले आहे. त्याने पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणली आहे. बजरंग पुनियाने बेलग्रेडमधील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. बजरंग पुनिया हा जागितक कुस्ती स्पर्धांमध्ये 4 पदके जिंकणारा एकमेव भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. Bajrang Punia’s historic performance
बजरंग पुनियाने आपली उत्कृष्ट खेळीची झलक अवघ्या जगाला पुन्हा एकदा दाखवली आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य आणि 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुनियाने सुवर्णपदक जिंकले होते. बजरंग पुनिया याच्या जागतिक स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याचा सिलसिला 2013 मध्ये सुरू झाला.
त्याने 2013 मध्ये कांस्यपदक, 2018 मध्ये रौप्य आणि 2019 मध्ये पुन्हा कांस्यपदक जिंकले आहे. 2022 मध्ये त्याने कांस्यपदकाची कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App