विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “इंडियाज गॉट लेटंट” शो मध्ये आई-वडिलांसंदर्भात अश्लील शेरेबाजी केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत युट्युबर रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा मखिजा, जसप्रीत सिंग आशिष चनचलानी, तुषार पुजारी, सौरभ बोथरा आणि बलराज घई या सर्वांना सुनावणीसाठी आज तारीख 17 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, आजच्या सुनावणीला यापैकी कोणीही वेगवेगळी कारणे देऊन हजर राहिले नाही. आपापल्या वकिलांमार्फत त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे गैरहजेरीचे कारण सांगितले. या कारणांवर कायदेशीर तरतुदीनुसार विचार करून राष्ट्रीय महिला आयोगाने या सर्वांना सुनावणीसाठी नव्या तारखा जारी केल्या. ६ ते ११ मार्च दरम्यानच्या या तारखा दिल्या. आता या नियोजित तारखांना या सगळ्यांना सुनावणीसाठी राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहावे लागेल.
रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा मखिजा यांनी आपल्या वैयक्तिक सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करणारी पत्रे आपपल्या वकिलांमार्फत राष्ट्रीय महिला आयोगाला दिली. सध्या वातावरण तापलेले आहे. ते थंड झाल्यानंतर सुनावणीला हजर राहू. तशी परवानगी द्यावी, अशी विनंती असे या तिघांनी त्या पत्रात वकिलांमार्फत नमूद केले. राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्या विनंतीचा कायदेशीर दृष्ट्या विचार करून या सर्वांना ६ मार्च रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले.
जसप्रीत सिंग, बलराज घई यांनी नियोजित परदेश दौऱ्याचे कारण महिला आयोगाला लिखित स्वरूपात पाठवले. भारतात परतल्यानंतर सुनावणीला हजर राहू, अशी कबुली दिली. आयोगाने त्यांना ११ मार्च रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले.
मात्र “इंडियाज गॉट लेटेंट” या शो चे निर्माते तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांनी आयोगाच्या आधीच्या समन्सला कोणतेही उत्तर न देता ते सुनावणीला गैरहजर राहिले. त्यावरून आयोगाने त्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीवर तिखट ताशेरे ओढले आणि त्यांना ६ मार्च रोजी सुनावणीला हजर राहण्याचे नवे समन्स बजावले.
India's Got Latent Row | National Commission for Women issues new hearing date following non-appearance of individuals Ranveer Allahbadia, Apoorva Mukhija, Ashish Chanchlani, Tushar Poojari and Saurabh Bothra summoned on March 6. Samay Raina, Jaspreet Singh and Balraj Ghai… pic.twitter.com/XoDYgxDNAD — ANI (@ANI) February 17, 2025
India's Got Latent Row | National Commission for Women issues new hearing date following non-appearance of individuals
Ranveer Allahbadia, Apoorva Mukhija, Ashish Chanchlani, Tushar Poojari and Saurabh Bothra summoned on March 6.
Samay Raina, Jaspreet Singh and Balraj Ghai… pic.twitter.com/XoDYgxDNAD
— ANI (@ANI) February 17, 2025
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App