विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानीतल्या अशोका हॉटेलात INDI नेत्यांची रंगली पार्टी; पण जागा वाटपाचा खडकावर आघाडीची बोट फुटली!!, अशी अवस्था आज आली. Rangali party of INDI leaders at Ashoka Hotel in the capital
काल 28 पक्षांच्याINDI आघाडीची बैठक राजधानीतल्या 5 स्टार अशोक हॉटेलमध्ये झाली. त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार करायची सूचना करून बाकीच्या बऱ्याच बड्या आणि प्रादेशिक नेत्यांची “विकेट” काढली, पण त्याच वेळी 31 डिसेंबर पर्यंत जागा वाटपाचा निपटारा करायचे ठरले. त्यानुसार वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जागा वाटपाची चर्चा केली. पण या चर्चेच्या पहिल्या फेरीतच आघाडीची बोट फुटल्याचे चित्र निर्माण झाले. कारण काँग्रेस तृणमूळ काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या तीन बड्या पक्षांमध्ये जागा वाटपावर मतभेद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले.
ममता बॅनर्जींनी राहुल गांधींशी झालेल्या चर्चेत पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसला फक्त 2 जागांची ऑफर दिली. त्यापलीकडे एकही जागा सोडू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले, हे कमी पडले म्हणून की काय ममतांनी काँग्रेसकडेच मेघालय आणि सिक्कीम मधल्या काही जागा तृणमूळ काँग्रेससाठी लढायला मागितल्या, तर दुसरीकडे काँग्रेसने आम आदमी पार्टीच्या नेत्यांना पंजाब मध्ये एकही जागा सोडू शकणार नसल्याचे सांगितले. पंजाब मध्ये एकूण 13 पैकी काँग्रेसचे 11 खासदार आहेत. पंजाब प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी आम आदमी पार्टीची युती करायला विरोध केला आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीला एकही जागा सोडणे शक्य होणार नाही, असे काँग्रेस नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या नेत्यांना कळवून टाकले.
जागा वाटपाच्या वादाच्या आगीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी तेल ओतले. पश्चिम बंगालमध्ये आम्ही काँग्रेस बरोबर जाऊ आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसचा पराभव करू, असे वक्तव्य केले. त्यामुळे ममता बॅनर्जी चिडल्या. अशोका हॉटेलमध्ये जमून तिथे चर्चेची पार्टी करून 24 तासही उलटले नाही, तोच जागा वाटपाच्या मुद्द्यावर खडकावर INDI आघाडीतल्या नेत्यांची बोट फुटली!!
तीन बड्या नेत्यांची बैठक
दरम्यान आज सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यात बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युल्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App