असदुद्दीन ओवेसी यांनी नुकतेच राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान केले होते
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जवळ येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राम मंदिराबाबत विरोधी पक्षनेतेही विरोध करत आहेत. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे. Ramotsav Yatra will start from Rameswaram to Ayodhya starting from Indore
सत्ताधारी पक्षाचे नेते ओवेसींच्या वक्तव्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. भाजप नेत्यांशिवाय आता राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी ओवेसींना फटकारलं आहे. मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले की, देश आता मुघलांच्या अधिपत्याखाली नाही. रामाचे विरोधक स्मशानात जातील, मंदिर पाडून मशीद बांधली होती.
‘माझ्या मुलाने साकारलेली रामलल्लाची मूर्ती संपूर्ण जगाला दिसेल’, अरुण योगीराजांच्या आईचे आनंदाश्रू थांबेना!
असदुद्दीन ओवेसी यांनी नुकतेच राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान केले होते. हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी यांनी राम मंदिराचे नाव न घेता म्हटले होते की तरुणांनी आपल्या मशिदी सुरक्षित ठेवाव्यात. आपण एकत्र आलो नाहीत तर मशिदी हिसकावून घेतल्या जातील. एवढेच नाही तर ओवेसींनी मुस्लिम तरुणांना भडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ओवेसी पुढे म्हणाले की, 500 वर्षांपासून जिथे नमाज अदा केली जात होती, तिथे आज काय होत आहे, हे तुम्ही पाहिलं आहे. आपल्या आणखी तीन-चार मशिदी हिसकावून घेतल्या जातील.
गिरीराज सिंह यांनी ओवेसींवर हल्लाबोल केला
ओवेसींच्या या वक्तव्यावर लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी ओवेसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गिरीराज सिंह म्हणाले की, ओवेसींच्या आत जिनांचा जिन्न घुसला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App