”राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी”

संत समितीने पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र


विशेष प्रतिनिधी

वाराणसी : प्रभू श्री राम यांचा त्यांच्या जन्मस्थानी म्हणजे अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरित मानसातील ‘नाथ सकल संपदा तुम्हारी, मैं सेवक समेत सुत नारी’ या ओळीच्या भावनेने त्या दिवशी सर्व सनातन धर्माचे अनुयायी त्या क्षणाचे साक्षीदार होऊ शकतील, यासाठी केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी संपूर्ण देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. अशी मागणी अखिल भारतीय संत समितीने केली आहे.Ram Mandir Pranpratistha Day 22nd January will be declared a public holiday



समितीचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रनंद सरस्वती यांनी यासाठी पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, 22 जानेवारी 2024 रोजी जेव्हा प्रभू रामलल्ला मंदिरात त्यांच्या जन्मस्थानी विराजमान होतील, तेव्हा संपूर्ण जगातील सनातन धर्मप्रेमी हिंदू समाज उत्सव साजरा करेल.

जेव्हा तुम्ही रामजन्मभूमीच्या गर्भगृहात बसून आचार्यांसोबत अभिषेक करत असाल, त्या वेळी संपूर्ण जग तुम्हाला आणि श्री रामजन्मभूमीला टीव्ही चॅनेल्सवर पवित्र भावनेने पाहत असेल. अशा परिस्थितीत पती ऑफिसमध्ये, पत्नी घरी आणि मुले शाळेत असतील तर प्रत्येकाचे मन दर्शनाने अपूर्णच राहते.

या 500 वर्षांच्या संघर्षाच्या समाप्तीच्या आणि भारतीय राष्ट्राच्या महान वैभवाच्या सुरुवातीच्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी लोकांनी आपल्या कुटुंबासह घरात आणि मंदिरांमध्ये असणे आवश्यक आहे. ही सुट्टी जाहीर केल्याने राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांमध्ये नमूद केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचेही पोषण होईल.

Ram Mandir Pranpratistha Day 22nd January will be declared a public holiday

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात