राम गोपाल वर्मांनी निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

मी यासाठी अजिबात सॉरी म्हणणार नाही कारण …. असंही राम गोपाल वर्मांनी म्हटलं आहे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्याविषयी बातमी आहे की ते आगामी निवडणुकीत पिथापुरम मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत. काल चित्रपट निर्मात्याबद्दल बातमी आली होती की ते आंध्र प्रदेशातील पिथापुरम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, पण आता खुद्द राम गोपाल यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. राम गोपाल वर्मा यांनी आपल्या एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये चित्रपट निर्मात्याने या बातम्यांना दुजोरा दिला आहे.Ram Gopal Varman gave clarification on the discussion regarding contesting elections



राम गोपाल वर्मा यांनी X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे ट्विट चुकीचे वाचण्यात आले आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. त्या ट्विटचा अर्थ असा होता की, मी पिथापुरममध्ये चित्रित झालेल्या वन-शॉट चित्रपटात भाग घेत आहे. राम गोपाल यांनी पुढे लिहिले की, मी यासाठी अजिबात सॉरी म्हणणार नाही कारण मी कुठेही निवडणूक हा शब्द लिहिला नव्हता.

काय प्रकरण आहे?

वास्तविक, राम गोपाल यांनी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये चित्रपट निर्मात्याने लिहिले होते की हा निर्णय अचानक घेण्यात आला आहे. आय एम कॉन्टेस्टिंग फ्रॉम पिथापुरम. चित्रपट निर्मात्याने आपल्या ट्विटमध्ये कुठेही निवडणूक हा शब्द वापरला नव्हता, परंतु त्यांच्या ट्विटनंतर लोकांरकडून अंदाज बांधला जाऊ लागला की ते पिथापुरममधून निवडणूक लढवत आहे.

Ram Gopal Varman gave clarification on the discussion regarding contesting elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात