विशेष प्रतिनिधी
लखनऊ : गलवान खोऱ्या त भारतीय जवानांनी गाजवलेला पराक्रम आणि बालाकोट एअर स्ट्राईकवर लोक ट्विटरच्या माध्यमातून शंका घेत होते. माध्यमांमध्ये वक्तव्य करीत होते. त्यावेळी मी अस्वस्थ होतो, असा टोला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहूल गांधी यांना लगावला आहे.Rajnath Singh lashes out at Rahul Gandhi
तेलिबाग येथे अखिल भारतीय माजी सैनिक सेवा परिषदेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, अरुणाचल प्रदेशातील विकसित करण्यात आलेल्या गावाबद्दल सध्या लोक चर्चा करीत आहेत. त्यामुळे आपण सीमेवर काय करीत आहोत, याबाबत चर्चा करण्याची मला इच्छा आहे.
मी स्वत: तिथे भेट देऊन परिस्थिती पाहिली आहे. संरक्षण सेवेतील आपल्या निडर अधिकाºयांचे मी अभिनंदन करतो. कोणतीही परिस्थिती असो, ते निश्चितच प्रत्युत्तर देतील. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आमची धोरणे स्पष्ट आहेत.1971 मध्ये झालेल्या तसेच 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात पराभव झालेल्या पाकिस्तानला आता दहशतवादासोबत संबंध तोडावे लागतील. दहशतवादाला आश्रय देणार नाही, अशी घोषणा पाकिस्तानला करावी लागली आहे.
संरक्षण मंत्री म्हणाले, भारताच्या शेजारी असाच एक देश असून, त्याचे नाव घेण्याची गरज नाही, असे त्यांनी चीनचे नाव न घेता सांगितले. सर्वच देशांसोबत मनमानी करण्याचे या देशाने ठरवले आहे. जसा करायला पाहिजे, तसा कित्येक देशांनी या देशाचा विरोध केला नाही.
यापूर्वी आपली परिस्थितीदेखील अशीच होती. मात्र, 2014 नंतर स्थिती बदलली आहे. सीमांवरील विकास आणि विविध योजनांमध्ये तीनही दलांच्या प्रमुखांसोबत मी प्रत्यक्ष सहभागी असतो. आपल्या वीर जवानांनी शेजारी देशाला मोठा आणि स्पष्ट संदेश दिल्याचे सांगताना मला आनंद होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App