वृत्तसंस्था
तवांग : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षीची दिवाळी वेगवेगळ्या सीमांवर जाऊन जवानांबरोबर साजरी करतात. 2023 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीन बॉर्डरवर अरुणाचल प्रदेशातल्या तवांगमध्ये जाऊन शस्त्रपूजन केले आणि जवानांबरोबर विजयादशमी विजयादशमी साजरी केली. rajnath singh Celebrating Vijayadashami with soldiers
यावेळी राजनाथ सिंह यांच्या समवेत तिन्ही सेनादलांचे प्रमुख जनरल मनोज पांडे हे देखील होते. राजनाथ सिंह आणि जनरल पांडे यांनी तवांग मध्ये फॉरवर्ड पोस्टवर जाऊन चीन सीमेची पहाणी केली. देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी चिनी सीमेवर जाऊन विजयादशमी साजरी करण्याचा हा गेल्या 75 वर्षांमधला पहिलाच प्रसंग ठरला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून दरवर्षीची दिवाळी वेगवेगळ्या सीमांवर जाऊन जवानांबरोबर साजरी केली, तर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी जवानांबरोबर साजरी करण्याचा पायंडा पाडला आहे. याची सुरुवात राजनाथसिंह यांनी चीन बॉर्डर वरील तवांग शहर निवडून सूचक पद्धतीने केली आहे. चीन अरुणाचल प्रदेशला स्वतःचा प्रदेश मानतो. तो भारतीय प्रदेश मानत नाही. त्याचबरोबर तवांगवर चीनच हक्क सांगत असतो. पण भारताने चीनचे हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश मधल्या वेगवेगळ्या सीमा ठाण्यांवर सैन्यबळ वाढवून आपले सीमा संरक्षण मजबूत केले आहे. विजयादशमीच्या दिवशी राजनाथसिंह यांनी तवांग दौरा करून फॉरवर्ड पोस्टला भेट देऊन शस्त्रपूजन केल्याने चीनला स्पष्ट इशारा गेला आहे.
समस्त भारतीयांना सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांविषयी आत्मीयता आहे. जवानांच्या पराक्रमाविषयी आत्मविश्वास आणि अभिमान आहे. सशस्त्र जवानांच्या मजबूत कामगिरीमुळेच विकसित देशांना देखील भारताचे जागतिक पातळीवरचे उंचावलेले स्थान मान्य करावे लागले, असे गौरवोद्गार राजनाथ सिंह यांनी काढले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App