ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह यांचा संतप्त सवाल
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. हे सर्व राजकीय पक्षांचे नेते लोकांपर्यंत पोहोचत आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिग्गजांकडून जम्मू-काश्मीरमधील जनतेपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया सुरूच आहे. या मालिकेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये जाऊन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्या अफझल गुरूबाबत केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
अफझल गुरूच्या फाशीबाबत ओमर अब्दुल्ला यांनी काय म्हटले होते, यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “मी ऐकले आहे की नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, अफझल गुरूला फाशी द्यायला नको होती. मला त्यांना विचारायचे आहे की, अफझल गुरूला फाशी द्यायला नको होती, तर मग काय त्याला हार घातला पाहीजे होता का? आणि हे लोक दावा करतात की ते कलम 370 बहाल करतील.
ते म्हणाले, “मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे सरकार बनवा आणि जम्मू-काश्मीरमधील विकास पाहून पीओकेचे लोक म्हणतील की, आम्हाला पाकिस्तानसोबत राहायचे नाही, आम्हाला भारतासोबत जायचे आहे.”
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ओमर अब्दुल्ला म्हणाले होते, “दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जम्मू-काश्मीर सरकारचा अफझल गुरूच्या फाशीशी काहीही संबंध नव्हता. तुम्हाला राज्य सरकारच्या परवानगीने हे करावे लागले असते, ज्याबद्दल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतो की असे घडत नाही. मला असे वाटत नाही की त्याला फाशी देऊन कोणताही हेतू साध्य झाला नाही.” मात्र, ओमर अब्दुल्ला यांनी अफझल गुरूच्या फाशीला चुकीचे ठरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी असे वक्तव्य केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App