ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह भाजपच्या वाटेवर, निवृत्तीसाठी अर्ज; उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवणार ?


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह यांनी निवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. ते भाजपामध्ये दाखल होऊन पुढील वर्षी होणारी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Rajeshwar Singh, an officer in the ED, on the way to the BJP, applied for retirement, the possibility of contesting the Uttar Pradesh Assembly elections

राजेश्वर सिंह हे सध्या लखनौमध्ये ईडीच्या विभागीय कार्यालयात संयुक्त संचालक आहेत. बी.टेक, पोलिस, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या विषयांमध्ये त्यांनी पीएचडी केली.

राजेश्वर सिंह २००९ मध्ये उत्तर प्रदेशमधून प्रतिनियुक्तीवर ईडीमध्ये दाखल झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये ते राज्य पोलिस सेवेमध्ये काम करत होते.
राजेश्वर सिंह यांनी सेवानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. ते उत्तर प्रदेशमध्ये भाजपात प्रवेश करू शकतात. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून लढू शकतात.



दरम्यान, राजेश्वर सिंह यांची बहीण आभा सिंह यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या, देशाची सेवा करण्यासाठी लवकर सेवानिवृत्ती स्वीकारण्यासाठी माझा भाऊ राजेश्वर सिंह यांची देशालागरज आहे. आभा सिंह सध्या मुंबईत राहतात.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर येथील रहिवासी असलेल्या राजेश्वर सिंह यांना २०१५ मध्ये स्थायी स्वरूपात ईडीच्या कॅडरमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांनी २ जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा, २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामधील अनियमितता आणि पी. चिदंबरम व त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्याविरोधातील आरोपांच्या चौकशीचे नेतृत्व केले होते. राजेश्वर सिंह यांचा विवाह पोलिस अधिकारी लक्ष्मी सिंह यांच्याशी झाला असूनत्या सध्या लखनौ रेंजमध्ये महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

Rajeshwar Singh, an officer in the ED, on the way to the BJP, applied for retirement, the possibility of contesting the Uttar Pradesh Assembly elections

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात