भाजपचे नेते राकेश पंडितांची हत्या करणारा दहशतवादी वाहिद शाह काश्मीरच्या त्राल मध्ये चकमकीत ठार

वृत्तसंस्था

त्राल : जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशामधील भाजपचे नेते राकेश पंडितांची हत्या करणारा जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी वाहिद शाह सुरक्षा दलांनी बरोबर झालेल्या चकमकीत आज त्राल मध्ये ठार झाला. त्याच्याबरोबर असणाऱ्या तीन दहशतवाद्यांना यांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर घातक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हे दहशतवादी त्राल मध्ये युद्ध साहित्याचे दुकान चालवत असल्यासारखे शस्त्रास्त्रांचा साठा जमवून बसत होते. An encounter has started in the upper reaches of the forest area of Nagbaeran Tral, Awantipora. Police and Army are undertaking the operation. Details awaited: Jammu & Kashmir Police

गेल्या दोन-अडीच महिन्यांमध्ये पाकिस्तानातून ड्रोन द्वारे आलेली शस्त्रास्त्रे त्यांच्याकडे साठा केलेली आढळली आहेत. आज आज पहाटेपासून जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल यांनी त्राल मध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू केली.

सुमारे तीन तास झालेल्या चकमकीनंतर तीन दहशतवादी सुरक्षा दल यांच्या ताब्यात आले. मात्र, या चकमकीत भाजपचे नेते राकेश पंडितांची हत्या करणार दहशतवादी वाहिद शाह ठार झाला, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिली.

– काय आहे त्राल?

हेच ते त्राल आहे की जिथून बुऱ्हाण वाणी हा दहशतवादी पैदा झाला होता. त्याला सुरक्षा दलांनी चकमकीत ठार मारल्यानंतर त्याच्या अंतयात्रेला याच त्राल मध्ये मोठी गर्दी झाली होती. परंतु आता त्राल मधले वातावरण एवढे बदलले आहे की त्याच बुर्‍हाण वाणीच्या वडिलांनी त्राल मधल्या सरकारी शाळेत 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले आहे.

An encounter has started in the upper reaches of the forest area of Nagbaeran Tral, Awantipora. Police and Army are undertaking the operation. Details awaited: Jammu & Kashmir Police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात