वृत्तसंस्था
मुंबई : कोरोमुळे दीड वर्षांपासून राज्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे कलाकारांची मोठी पंचायत झाली आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कलाकारांना किमान आता खड्डे बुजविण्याची तरी कामं द्या, असा निशाणा ‘ठाकरे’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी राज्य सरकारवर साधला आहे. Give artists at least the job of filling the Potholes ; ‘Thackeray’ director Abhijit Panse targets state government
सिनेमागृहे बंद असल्याने कलाकार, तमाशा कलावंत आणि नाटक क्षेत्रातील कलाकारांचीही मोठी अडचण होत आहे. त्यामुळे, आता सिनेदिग्दर्शक, अभिनेते, कलाकार आणि सिनेक्षेत्राशी संबंधित इतर मंडळीही रोष व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर पानसे यांनी सरकारवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेते प्रशांत दामले यांनी फेसबुकवरुन याच मुद्यावर नाराजी उघड केली होती.
सरकारने नाट्य कलावंत आणि बॅकस्टेज कलाकारांना निदान रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची कामं द्यावीत. कारण नाट्यगृहात कोरोना आहे, रस्त्यावर नाही !
– अभिजीत पानसे, दिग्दर्शक
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more