सलमान खानने मारलेल्या काळविटाचे उभारणार स्मारक, राजस्थानच्या बिष्णोई समाजाने केली घोषणा


वृत्तसंस्था

जोधपूर : बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सलमानला जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यापासून त्याने सार्वजनिक ठिकाणी जाणे बंद केले असून त्याच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. काही काळापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. Rajasthan’s Bishnoi community has announced that it will build a memorial for the black man killed by Salman Khan

बिष्णोई समाजातील लोक काळविटाला देवाचा अवतार मानतात. सलमानवर काळवीट मारल्याचा आरोप आहे. 24 वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान शिकारीसाठी गेला होता तेव्हा हे प्रकरण समोर आले होते. काळविटावर श्रद्धा ठेवणाऱ्या बिष्णोई समाजाने आता कांकणी गावात काळवीटाचे मोठे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, ज्या ठिकाणी हरणाचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी कांकणी गावात स्मारकासह एक मोठे प्राणी बचाव केंद्र बांधले जाणार आहे. सात बिघा जागेवर हे स्मारक उभारले जाणार आहे.

3 फुटांचे स्मारक उभारणार

हे स्मारक 3 फुटांचे असेल, ज्याचे वजन 800 किलो असेल. यासोबतच एक रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार असून तेथे प्राणी आणि पक्ष्यांवर उपचार केले जाणार आहेत. काकाणी गावातील मंदिरात ही काळविटाची मूर्ती बसवण्याची तयारी आहे. गावातील लोकांनी देणगी जमा करून हे मंदिर बांधले आहे.

यामुळे मंदिर बांधणार

गावातील रहिवासी हनुमान राम बिश्नोई यांनी सांगितले की, जेव्हा सलमान खानने येथे काळविटाला मारले त्यानंतर लोक प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी मंदिर बांधण्याची मागणी करत होते, जेणेकरून लोक प्राण्यांचे संरक्षण करायला शिकतील. जनावरांना वाचवायचे आहे, हे लक्षात राहावे म्हणून हे मंदिर येणाऱ्या पिढीसाठी बांधावे, अशी ग्रामस्थांची धारणा आहे.

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला जामीन मंजूर केला होता. ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन काळवीट मारल्याप्रकरणी सलमानला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. त्यावेळी नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रेही सलमानसोबत शिकारीसाठी गेल्या होत्या. तेव्हापासून बिश्नोई गँगच्या सदस्यांनी सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

Rajasthan’s Bishnoi community has announced that it will build a memorial for the black man killed by Salman Khan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात