वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला. बफेलोजवळच्या चौटाउक्का येथे वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. हल्ल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले. सलमान रश्दी यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. शस्त्रक्रियेनंतर ते एक डोळा गमावू शकतात. रश्दी यांचे एजंट अँड्र्यू वायली यांनी सांगितले की, त्यांना बोलू शकत नाहीयेत. Salman Rushdie’s attacker identified, writer on ventilator, at risk of losing an eye
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, शस्त्रक्रियेनंतर सलमान रश्दी हे एक डोळा गमावू शकतात. याशिवाय त्यांच्या हाताच्या नसाही फाटल्या. हल्लेखोराने चाकूने केलेल्या हल्ल्यात त्यांचे यकृतही क्षतिग्रस्त झाले आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरनंतर, आता या घटनेवर पोलिसांचेही वक्तव्य आले आहे.
न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताची ओळख पटली असून तो न्यू जर्सी येथील 24 वर्षीय हादी मातर आहे. मानेवर आणि पोटात वार झाल्याने रश्दी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चौटाउक्का येथे घडलेली घटना आमच्या जवळपास 150 वर्षांच्या इतिहासात कधीही घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आमचे काम सध्या सलमान रश्दीच्या कुटुंबासाठी एक संसाधन बनणे आहे. या हल्ल्याचा उद्देश समजून घेण्यासाठी आम्ही FBI सोबत काम करत आहोत.
Salman Rushdie Profile: कोण आहेत सलमान रश्दी? न्यूयॉर्कमध्ये झाला जीवघेणा चाकूहल्ला, आता व्हेंटिलेटरवर
वादग्रस्त राहिले रश्दी यांचे जीवन
सलमान रश्दी यांचे आयुष्य खूप वादग्रस्त राहिले आहे. 1989 पासून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. शुक्रवारी सकाळी व्याख्यान देण्यापूर्वी CHQ 2022 कार्यक्रमासाठी स्टेजवर असताना लेखकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. न्यूयॉर्क पोलिसांनी सांगितले की एका संशयिताने लेखकाच्या व्याख्यानापूर्वी स्टेजवर पोहोचल्यानंतर प्राणघातक हल्ला केला.
रश्दींना बुकर पारितोषिकही मिळाले
सलमान रश्दी हे प्रसिद्ध लेखक आहेत. 1981 मध्ये त्यांचे मिडनाइट्स चिल्ड्रन नावाचे पुस्तक होते. त्या पुस्तकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यानंतर भारतात झपाट्याने बदलणारी परिस्थिती सुंदरपणे सांगण्यात आली. त्या पुस्तकासाठी सलमानला बुकर पुरस्कारही मिळाला होता.
पण सलमान या यशाने खुश होण्याआधीच त्यांच्या आणखी एका पुस्तकाने मोठा गोंधळ निर्माण केला. त्या पुस्तकाचं नाव होतं The Satanic Verses. या पुस्तकाचे इराणमध्ये अजिबात स्वागत झाले नाही. या पुस्तकातून त्यांच्या धर्माचा अपमान होत असल्याचा आरोप तेथील मुस्लिम समाजाने केला आहे. त्या पुस्तकानंतर वाद इतका चिघळला की 1989 मध्ये इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दींच्या मृत्यूची मागणी करणारा फतवा काढला. इतकंच नाही तर रश्दीची हत्या करणाऱ्याला 3 मिलियन डॉलर्सहून अधिक बक्षीस देण्याचेही या फतव्यात सांगितले आहे.
इराणने 1998 मध्ये दिले स्पष्टीकरण
हा वाद पाहून सलमान रश्दींना अनेक वर्षे अज्ञातवासात राहावे लागले. 1998 मध्ये इराणने स्पष्ट केले की, ते सलमान रश्दी यांच्या हत्येचे अजिबात समर्थन करत नाहीत. त्या फतव्यालाही त्यांच्या बाजूने महत्त्व दिले गेले नाही. पण इराणची ती वृत्तीही एका समाजातील सलमानबद्दलचा द्वेष कमी करू शकली नाही. या कारणास्तव, 2012 मध्ये अर्ध-अधिकृत इराणी धार्मिक प्रतिष्ठानने रश्दीसाठीचे बक्षीस 2.8 मिलियन डॉलर्सवरून वाढवून 3.3 मिलियन डॉलर्स केले. पण नंतर खुद्द सलमान रश्दींनी त्या फतव्यांकडे फारसे लक्ष दिले नाही. ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत राहिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App