अवघा देश उकाड्याने हैराण असताना जम्मू-काश्मीरमध्ये मात्र पाऊस अन् बर्फवृष्टी!

भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली, शाळा बंद; चारजण वाहून गेली Rain and snowfall disrupt life in Jammu and Kashmir

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यांमध्ये उष्णतेमुळे परिस्थिती दयनीय आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि डोंगरावर बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. मुसळधार बर्फवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलनामुळे राज्यात तीन अनेक घरे कोसळली आहेत. तर अनेक घरे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस आणि भूस्खलनामुळे बारामुल्ला, किश्तवाड आणि रियासी जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

यासोबतच आज म्हणजेच मंगळवारीही बहुतांश भागात बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मंगळवारी काश्मीरमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर मुसळधार पावसाच्या अलर्टमुळे आज (३० एप्रिल) होणारी काश्मीरची ज्युनियर असिस्टंट टाईप परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गाबाबत अधिकाऱ्यांनी प्रवाशांना महामार्गावर न जाण्याचा आणि ढिगारा साफ होईपर्यंत प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

खोऱ्यातील अनेक भागात भूस्खलन झाल्यामुळे अनेक डोंगराळ आणि दुर्गम भागातील रस्त्यांचे नुकसान झाले असून भूस्खलनाच्या ढिगाऱ्यांमुळे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे या भागांचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. भूस्खलनामुळे किश्तवाडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रियासीच्या डोडा, रामबन आणि गुलाबगडमध्ये नदी-नाल्यांमध्ये चार जण वाहून गेले असून, यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचवेळी दरड कोसळणे, घर कोसळणे आणि घसरल्याने बस खड्ड्यात पडून 22 जण जखमी झाले असून त्यात 12 मुलांचा समावेश आहे.

Rain and snowfall disrupt life in Jammu and Kashmir

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात