मोदींची टीका झोंबली, “भटकता आत्मा” असल्याची पवारांची कबुली!!; पण…


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेली “पॉलिटिकल केमिस्ट्री” विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर “भटकता आत्मा” म्हणून प्रहार केला होता. या प्रहाराला शरद पवारांनी आपण भटकता आत्मा असल्याची कबुली देऊन प्रत्युत्तर दिले. पण त्याची कारणे त्यांनी वेगळी सांगितली.sharad pawar accepts that he is unrestful ghost, but for different reasons

आपल्याला पंतप्रधान पद मिळाले नाही किंवा नरसिंह राव, सीताराम केसरी आणि सोनिया गांधी यांच्या पुढे आपली डाळ शिजली नाही, केंद्राच्या राजकारणात आपल्याला विशिष्ट टप्प्यापलीकडे फारसे महत्त्व मिळाले नाही, याबद्दल आपण “अस्वस्थ आत्मा” असल्याचे पवार म्हणाले नाहीत. उलट देशात महागाई वाढली, सर्वसामान्य जीवन कठीण झाले म्हणून आपण “अस्वस्थ आत्मा” असल्याचे पवारांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल पुण्यातल्या सभेत शरद पवारांवर जोरदार प्रहार केला. 2019 मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राच्या जनादेश धुडकावून ठाकरे – पवार सरकार बनवले होते. त्याचा वचपा मोदींनी काल काढला. मोदी त्यांना थेट “भटकता आत्मा” म्हणाले. आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही म्हणून हा “भटकता आत्मा” गेली 45 वर्षे दुसऱ्याचे बिघडवण्यातच आनंद मानतो आहे. तो आपल्या पक्षाचे बिघडवतो. आपल्या परिवाराचेही बिघडवतो, अशा कठोर शब्दांमध्ये मोदींनी पवारांवर प्रहार केले. त्यावर संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात पडसाद उमटतील, अशी अपेक्षा मराठी माध्यमांनी कालच व्यक्त केली होती. प्रत्यक्षात मोदींच्या वक्तव्याचे पडसाद फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उमटले. आमदार रोहित पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवारांनी मोदींना प्रत्युत्तर दिले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत शरद पवार यांनी आपण “अस्वस्थ आत्मा” असल्याची कबुली देऊन टाकली. पण आपल्याला देशाचे पंतप्रधान पद मिळाले नाही किंवा आपली नरसिंह राव, सीताराम केसरी आणि सोनिया गांधी यांच्यापुढे डाळ शिजली नाही किंवा आपले केंद्रीय राजकारणात फारसे काही चालले नाही किंवा अजूनही आपल्या मुलीचे राजकीय बस्तान बसले नाही म्हणून आपण “अस्वस्थ आत्मा” असल्याचे पवार म्हणाले नाहीत. उलट देशातल्या जनतेला कठीण दिवस आले आणि देशात महागाई वाढल्याने आपण “अस्वस्थ आत्मा” असल्याचे पवार म्हणाले.

 शरद पवार म्हणाले :

पंतप्रधान काल म्हणाले ईडीचा मी 1 % देखील ही वापर करत नाही. पण जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे, त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही 1 % म्हणा की आणखी काय म्हणा. पण तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय.

माझे बोट धरून राजकारणात आलेले, आता माझ्या बद्दल काय बोलतात??, तर एक आत्मा भटकत आहे असं तुम्ही म्हणता. त्या पण हा आत्मा स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी अस्वस्थ आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. माझ्यावर संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही. महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही.

राहुल गांधींवर केलेल्या टीकेचा पवारांना राग

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या मोदींना शरद पवार यांनी खडेबोल सुनावले. पंतप्रधान राहुल गांधींवर टीका करतात. शहजादे क्या करेंगे? मोदींना कायतरी वाटायला हवं, राहुलच्या तीन पिढ्या देशासाठी झटल्या आहेत. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी झटले आहेत. गरिबी हटविण्यासाठी इंदिरा गांधींची हत्या झाली. आधुनिकेतवर देश पुढे जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आजींनी देशासाठी बलिदान केले. त्या राहुल गांधींना म्हणतात, शहजादे काय करणार?? कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी मोदी काहीही खोटं बोलताहेत. ते चुकीच्या पद्धतीने टीका टिपणी करत असतील, तर अशांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचे आहे, असे शरसंधान नाही पवारांनी साधले.

sharad pawar accepts that he is unrestful ghost, but for different reasons

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात