विशेष प्रतिनिधी
मुंबई – स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ केला. रेल्वे कौशल्य विकास योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांत ५० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. Railway will give training to 50 thousand youth
सुरुवातीला एक हजार उमेदवारांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर आणि यंत्र दुरुस्ती अशा चार विभागांत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ऑनलाईन प्राप्त होणाऱ्या अर्जांमधून दहावीतील गुणांच्या आधारावर, पारदर्शी प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.
East Central Railway Recruitment 2021: पूर्व मध्य रेल्वेमध्ये ‘या’ पदांवर नोकरीची संधी; 30 एप्रिलपर्यंत करा अर्ज
या कार्यक्रमाबाबत माहिती पुरवण्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. अर्ज मागवण्याची सूचना, निवड झालेल्या व्यक्तींची सूची, अंतिम मूल्यांकन, अभ्यासासाठीचे साहित्य आणि इतर तपशील यावर उपलब्ध असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App