विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या कामगिरीवर ठपका ठेऊन त्यांना दूर करून त्यांच्या जागी लोकसभा काँग्रेस गटनेतेपदासाठी राहुल गांधींचे नाव पुढे आले आहे. Rahul Gandhi`s name for congress leadership in lok sabha, sonia and priyanka gandhi are trying to convince him to accept the post
ममता बॅनर्जींशी राजकीय जुळवून घेण्याच्या दृष्टीने सोनियांनी अधीर रंजन यांना लोकसभा गटनेतेपदावरून दूर करण्यास तयार झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी राहुल गांधी यांची नियुक्ती करून काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी परिवाराव्यतिरिक्त नेत्याला नेमण्याचा मार्ग मोकळा करून देण्याची तयारी केली जात आहे. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.
सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींशी काँग्रेसच्या केंद्रीय राजकारणाच्या दृष्टीने जुळवून घेण्याचे ठरविले असले, तरी पश्चिम बंगालमधील उरली सुरली काँग्रेस संपविण्याचा ममता बॅनर्जींचा मनसूबा बदललेला दिसत नाही. माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांना काँग्रेसमधून फोडून ममतांनी तृणमूळमध्ये बिनदिक्कतपणे सामावून घेतले आहे.
काँग्रेसमध्ये काही मिळण्याची शक्यता नाही म्हणून आपण तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेशाचा मार्ग निवडल्याचे अभिजित मुखर्जी उघडपणे म्हणाले आहेत.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय राजकारणाची डागडुजी करण्याच्या कामी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी लागल्याचे मानले जात आहे. राहुल गांधींनी लोकसभेतले काँग्रेसचे गटनेतेपद संभाळावे, या दोघीही त्यांचे मन वळवत असल्याचे बातमीत म्हटले आहे. पण लोकसभेतली राहुल गांधी यांची उपस्थिती हा त्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. त्याच बरोबर राहुल गांधींना फक्त काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते पद देऊन चालणार नाही. तर त्यांना सोनियांकडे होते, तसे काँग्रेसचे संसदीय गटाचे नेतृत्व सोपवावे लागेल, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. काही नेत्यांचा राहुल गांधींच्या या नेमणूकीला देखील विरोध असल्याची काँग्रेसच्याच वर्तुळात चर्चा आहे.
अर्थात या सर्व बाबी सध्या चर्चेच्या पातळीवर आहेत. लोकसभेतले गटनेते पद, संसदीय नेतेपद स्वीकारायचे की नाही, हे सर्वस्वी राहुल गांधी यांच्यावर अवलंबून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App