राहुल गांधींची जातनिहाय जनगणनेची मागणी; आनंद शर्मांनी दाखविले इंदिरा गांधींच्या राजकीय वारशाकडे बोट!!

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली :  काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी प्रादेशिक पक्षांचा जात राजकारणाचा अजेंडा काँग्रेसकडे वळवून घेण्याच्या प्रयत्नात देशात जातनिहाय जनगणनेची मागणी केली. मात्र, नेमक्या त्याच मुद्द्यावर काँग्रेस कार्यकरिणीचे सदस्य माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी इंदिरा गांधींच्या राजकीय वारशाकडे बोट दाखविले आहे. Rahul Gandhi’s demand for caste-wise census

आनंद शर्मांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक पत्र लिहून जातनिहाय जनगणना हा देशातल्या बेरोजगारीच्या समस्येचे उत्तर असू शकत नाही. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी देखील धोरणात्मक निर्णय घेऊन तशी जातनिहाय जनगणना केली नव्हती, याकडे लक्ष वेधले.

आनंद शर्मा यांनी १९ मार्च रोजी खर्गेंना पत्र लिहिले, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. खर्गेंना पाठविलेल्या पत्राची प्रत आनंद शर्मांनी काँग्रेस कार्यकारणीतील सर्व सदस्यांना सर्व प्रदेशाध्यक्षांना आणि काँग्रेसच्या सर्व विधिमंडळ नेत्यांना पाठवली आहे. पण
आनंद शर्मांचे हे पत्र नेमके अशा वेळी व्हायरल झाले आहे, जेव्हा मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसची आर्थिक कोंडी करत असल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आपल्या भारत जोडो न्याय यात्रेत वारंवार उचलून धरला देशात 90% समाज ओबीसी बिछडा दलित आदिवासी असताना त्यांना सत्ता पदांवर संधी मिळत नाही असा दावा त्यांनी केला या पार्श्वभूमीवर जातनिहाय जनगणना करून जिसकी जितनी आबादी उतनी उसकी हिस्सेदारी अशी घोषणा केली. काँग्रेस सत्तेवर आली, तर जातनिहाय जनगणना करून प्रत्येक जातीला सत्तेतला तितक्या टक्क्यांचा वाटा दिला जाईल, असे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर आनंद शर्मांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या सर्व समावेशक धोरणाची आठवण करून देणारे पत्र काँग्रेस अध्यक्ष यांना पाठवून राहुल गांधींशी मतभेद व्यक्त केला आहे.

Rahul Gandhi’s demand for caste-wise census

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात