राहुल गांधींनी टीआरपी घेतला खेचून; पण तुषार गांधींच्या पाठिंब्यानंतरही शेगावातल्या भाषणात सावरकर टाकले वगळून

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा टीआरपी वेगवेगळ्या विषयांमुळे वाढतच नव्हता. त्यामुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय उकरून टीआरपी आपल्याकडे खेचून घेतला. त्यानंतर आज 18 नोव्हेंबर 2000 रोजी दिवसभराच्या घडामोडींनंतर शेगाव मधल्या भाषणातून सावरकर हा विषय वगळून टाकला. Rahul Gandhi took TRP by pulling; Except Savarkar’s speech in Shegaon

संजय राऊतांना क्रेडिट

मराठी माध्यमांनी मात्र याचे क्रेडिट नेहमीप्रमाणे तुरुंगातून सुटून आलेले खासदार संजय राऊत यांना देऊन टाकले. कारण सावरकरांच्या टीकेमुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संजय राऊत यांच्या मुखातून राहुल गांधींना महाविकास आघाडी तुटू शकते, असा इशारा दिला होता. त्यामुळे काँग्रेसने सावध पवित्रा घेऊन राहुल गांधींच्या भाषणातून सावरकरांचा माफीनाम्याचा मुद्दा वगळून टाकल्याची चर्चा मराठी माध्यमांनी केली आहे.

फडणवीसांच्या ट्विटर फैरी

राहुल गांधींच्या भाषणाचे टाइमिंग साधून देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक ट्विटरच्या फैरी झाडल्या. त्यामध्ये त्यांनी महात्मा गांधी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई, माजी मुख्यमंत्री शरद पवार, कम्युनिस्ट पक्षाचे सर्वात मोठे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची वक्तव्ये आणि पत्रे ट्विट करून राहुल गांधींवर प्रश्नाच्या फैरी झाडल्या होत्या. आपण हे सगळे वाचले आहे का?? आपण फक्त सिलेक्टिव गोष्टी वाचता आणि इतरांना वाचायला सांगता. आपण फक्त आपल्या व्होट बँकेची काळजी करता का??, असे तिखट सवाल फडणवीस यांनी केले. त्याच्या आधी राहुल गांधींनी कायद्याच्या चौकटीत राहून भारत जोडो यात्रा केली तर काहीच अडचण नाही. पण त्यांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन काही केले, तर कारवाई करावीच लागेल, असा इशारा दिला होता.



राहुलजींचे नेहमीचे भाषण

त्यानंतर राहुल गांधींचे शेगावच्या जाहीर सभेत भाषण झाले. त्या भाषणात राहुल गांधींनी नेहमीप्रमाणे भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीकास्त्र सोडले. ते सर्व मुद्दे आधीच्याच भाषणाप्रमाणे भाजप हिंसा आणि नफरत फैलावतो आहे वगैरे असेच होते. परंतु त्या भाषणातून सावरकरांचा मुद्दा राहुल गांधींनी वगळून टाकला होता. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना राहुल गांधींनी उत्तरे दिली नाहीत.

जयराम रमेश – संजय राऊत चर्चा

त्याचबरोबर संजय राऊत यांनी आज सकाळी महाविकास आघाडी तुटू शकते, असा जो इशारा दिला होता, त्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. सावरकरांच्या मुद्द्यावर दीर्घ चर्चा केली. त्यानंतर त्यांनी स्वतःच महाविकास आघाडी तुटणार नाही, अशी ग्वाही संजय राऊत यांनी दिल्याचे पत्रकारांना सांगितले. पण या सगळ्याचे सार राहुल गांधींनी आपल्या भाषणातून सावरकर हा मुद्दा वगळण्यात झाले आणि आजच्या दिवसाची भारत जोडो यात्रा थांबली.

तुषार गांधींच्या पाठिंब्यानंतरही…

दरम्यानच्या काळात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासमवेत भारत जोडो यात्रेत चालून सावरकरांच्या माफीनामाच्या मुद्द्यावर त्यांना पाठिंबा दिला होता. आपले पणजोबा महात्मा गांधी आणि राहुल गांधींचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू हे दांडीयात्रेत एकत्र चालले. ते स्वातंत्र्यलढ्यात एकत्र होते. आज आम्ही दोन्ही पण तू भारत जोडो यात्रेत एकत्र आहोत, अशी ग्वाही दिली परंतु तुषार गांधींच्या पाठिंबा नंतरही राहुल गांधींनी शेगावच्या जाहीर सभेत सावरकरांवर बोलणे टाळले.

Rahul Gandhi took TRP by pulling; Except Savarkar’s speech in Shegaon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात