राहुल गांधींनी सांगितली आजकालची “राजकीय फॅशन”; पण हे “फॅशन क्रिएशन” मोदींचे की त्यांच्याच आजीचे??

नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारची राजधानी पाटण्यात केलेल्या भाषणात आजकालची “राजकीय फॅशन” सांगितली. त्यांनी देशाच्या पॉवर स्ट्रक्चरचे वर्णन केले. पण ही “राजकीय फॅशन” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “क्रिएट” केली आहे की राहुल गांधींच्या आजीने म्हणजेच इंदिरा गांधींनी “क्रिएट” केली आहे??, मात्र त्यांनी सांगितले नाही.

राहुल गांधी म्हणाले :

आज इंडियाचे पॉवर स्ट्रक्चर असे बनले आहे की तिथे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक यांचे पार्टीसिपेशन किती आहे??, हा सवाल आहे. आज-काल अशी ‌‌”राजकीय फॅशन” बनली आहे, की प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या जातीच्या जमातीच्या लोकांना लोकप्रतिनिधित्वाची तिकिटे देतो, पण प्रत्यक्षात त्या लोकप्रतिनिधींना अधिकार किती असतात??, हा अभ्यासाचा विषय आहे. पंतप्रधान मोदी पण याला “राजकीय फॅशनच” म्हणतात. पण मोदींनी आपल्या आमदार + खासदारांचे अधिकार स्वतःकडे खेचून घेतलेत. त्यांनी दलित, आदिवासींना मंत्री बनवले, पण त्यांचे ओएसडी संघातून आणून नेमले. त्यामुळे सगळ्या मंत्रालयांची सत्ता मोदींकडेच केंद्रित झाली. मोदींच्या पक्षातून निवडून आलेल्या खासदारांना निर्णय घेण्याचे अधिकारच नाहीत. निर्णय विशिष्ट केंद्राकडून होतात. म्हणूनच मी सवाल केला, यात दलित आदिवासी अल्पसंख्यांक यांचा सहभाग किती??

राहुल गांधींनी “राजकीय फॅशन” विशद करून पंतप्रधान मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात जरूर उभे केले. त्यांनी सगळी सत्ता स्वतःकडे कशी केंद्रित केली, याचे वर्णन केले. त्यानिमित्ताने त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घेरले. पण मूळात ही सत्ता पंतप्रधानपदाकडे केंद्रित करण्याची मूळ प्रवृत्ती नेमकी कोणाची होती??, सगळे सत्ताकेंद्र आपल्याकडे ठेवण्याचा अट्टाहास कोणाचा होता??, याचा बारकाईने आढावा घेतल्यावर त्या संदर्भात थेट इंदिरा गांधींकडे अंगुली निर्देश करावा लागतो.

इंदिरा गांधींच्या काळात राजकीय आणि प्रशासकीय मनमानी वाढली. आपल्याला हवे ते मंत्री, हवे ते सचिव नेमण्याची परंपरा इंदिरा गांधींच्या काळात रूढ झाली. यात मंत्र्यांचे अधिकार इंदिरा गांधींनी बिलकुल सहन केले नाहीत. सगळ्या गृह, अर्थ, संरक्षण या महत्त्वाच्या मंत्रालयांमधले गुप्तचर विभाग इंदिरा गांधींनी संबंधित मंत्रालयांपासून तोडून ते थेट पंतप्रधान कार्यालयाला जोडले. त्या गुप्तचर विभागांचे सगळे रिपोर्टिंग फक्त पंतप्रधानांना ठेवले. या रिपोर्टिंग मधून सगळ्या महत्त्वाच्या मंत्र्यांना वगळले. इंदिरा गांधींनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत जेवढे मुख्यमंत्री बदलले, तेवढे मुख्यमंत्री अन्य कुठल्याही पंतप्रधानाच्या कारकिर्दीत बदलले गेले नाहीत. इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत वेगवेगळी कारणे सांगून जेवढी राज्य सरकारे बरखास्त केली गेली, तेवढी कधीच कुठल्याच पंतप्रधानांच्या कार्यकाळात बरखास्त केली गेली नाहीत.

राहुल गांधींनी मोदी आणि ज्या पॉवर स्ट्रक्चरची बात केली, ते सगळे “पॉवर स्ट्रक्चर” इंदिरा गांधींच्याच काळात बनवले गेले आणि मजबूत केले गेले. इंदिरा गांधी सोडून किंवा गांधी परिवार सोडून अन्य कुणालाही त्या पॉवर स्ट्रक्चर मध्ये शिरकावही करता येणार नाही, याची “व्यवस्था” केली गेली. पी. सी. अलेक्झांडर, प्रणव मुखर्जी, नटवर सिंह या सगळ्या बड्या नेत्यांच्या आत्मचरित्रातून त्याची साक्ष मिळते. त्यामुळे राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या नावावर खपवलेली “राजकीय फॅशन” आणि “पॉवर स्ट्रक्चर” ही मोदींची कामगिरी नसून ते प्रत्यक्षात इंदिरा गांधींचे “क्रिएशन” होते हेच यातून समोर आले.

Rahul Gandhi talks about today’s “political fashion”

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात