विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राहुल गांधी परदेश दौऱ्यावर जाणार होते. निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर त्यांच्या परदेश दौऱ्यावर भाष्य सुरू झाले. मात्र, आता राहुल यांचा विदेश दौरा रद्द झाल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनपेक्षित परिस्थितीमुळे राहुल यांचा विदेश दौरा रद्द करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.Rahul Gandhi suddenly canceled his foreign tour Congress gave the reason
राहुल गांधी 8 डिसेंबरपासून दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या सात दिवसांच्या दौऱ्यावर जाणार होते. ते 8 डिसेंबरला संध्याकाळी मलेशियाला पोहोचणार होते आणि 10 डिसेंबरपर्यंत तिथे राहणार होते. यानंतर ते 11-12 डिसेंबरला सिंगापूरला जाणार होते. सिंगापूरनंतर राहुल 13 डिसेंबरला जकार्ताला पोहोचणार होते. त्याचवेळी 14 डिसेंबरला राहुल हनोईला जाणार होते. यानंतर ते 15 डिसेंबरच्या रात्री हनोईहून दिल्लीला रवाना होणार होते. रिपोर्टनुसार, राहुल या देशांतील काही विद्यापीठांमध्ये भारतीय प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांना संबोधित करणार होते. मात्र, आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
तेलंगणा वगळता सर्व राज्यांमध्ये काँग्रेससाठी वाईट परिणाम दिसून आले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने पूर्ण बहुमत मिळवले आहे आणि मिझोराममध्येही दोन जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधीही विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App