RSS on Rahul Gandhi: राहुल गांधींनी अधिक जबाबदारी दाखवून वास्तव पाहावे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सल्ला!

Dattatray Hosbale

‘’ज्यांनी देशाचे तुरुंगात रूपांतर केले त्यांनी यासाठी कधीच माफी मागितली नाही.’’ असं दत्तात्रय होसाबळेंनी म्हटलं आहे.

प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सल्ला दिला आहे. आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या शेवटच्या दिवशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रय होसाबळे म्हणाले की, राहुल गांधींनी अधिक जबाबदारी दाखवून वास्तव पाहावे. संघावर राहुल गांधींच्या सततच्या टिप्पणीबाबत माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना दत्तात्रय होसाबळे म्हणाले की, यावर भाष्य करण्याची गरज नाही असे मला वाटते. ते त्यांचा राजकीय अजेंड्यावर चालत आहेत . आमच्यात आणि त्यांच्यात स्पर्धा नाही.  Rahul Gandhi should show more responsibility and face reality  advice of Rashtriya Swayamsevak Sangh

ते पुढे म्हणाले, “ते संघाबद्दल बोलतात, यावर मी एवढेच म्हणेन की त्यांच्या काँग्रेसमधील पूर्वजांनी संघावर अनेक टिप्पण्या केल्या. देशातील आणि जगातील जनता संघाला स्वतःच्या अनुभवातून पाहत आहे आणि त्यातून शिकत आहे, कदाचित त्यांनाही कळेल. मला एवढेच म्हणायचे आहे की, विरोधी पक्षातील प्रमुख राजकारणी म्हणून त्यांनी अधिक जबाबदारी दाखवावी आणि वास्तव पाहावे.”


महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना हे न्यायालय पुन्हा बोलवू शकत नाही – सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे वकील हरीश साळवेंचा जोरदार युक्तीवाद


काँग्रेसवर बोलताना ते म्हणाले, “मी आणीबाणीच्या काळात तुरुंगात होतो. ज्यांनी देशाचे तुरुंगात रूपांतर केले त्यांनी यासाठी कधीच माफी मागितली नाही. त्यांना लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे की नाही, हे जनतेने ठरवावे.’’

याशिवाय प्रसारमाध्यमांशी बोलताना दत्तात्रय होसाबळे म्हणाले की, भारताची ती ओळख जी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट राहिली आहे, ती आजच्या काळात जगासमोर मांडायची आहे. पुढील २५ वर्षांत भारताला केवळ आर्थिक आणि पायाभूत सुविधाच नव्हे तर क्रीडा आणि संस्कृतीसारख्या इतर अनेक क्षेत्रांचा विकास करायचा आहे.

Rahul Gandhi should show more responsibility and face reality  advice of Rashtriya Swayamsevak Sangh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात