विशेष प्रतिनिधी
कोलकाता : 2024 च्या लोकसभा निवडणुका जाहीर व्हायला अवघे काही दिवस उरले असताना भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी यांच्यात प्रचंड घमासान सुरू आहे आणि या घामासानात राहुल गांधींची भारत जोडून न्याय यात्रा पूर्वेकडून पश्चिमेकडे दररोज पुढे सरकत असताना काँग्रेस मधून एकापाठोपाठ एक नेते पक्षाला सोडून जात आहेत.Rahul Gandhi says he wants people like ‘Himanta and Milind to leave’ Congress
या पार्श्वभूमीवर बंगाल मधल्या सोशल मीडिया वॉरियर्स बोलताना राहुल गांधींनी धक्कादायक वक्तव्य केले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा आणि मुंबईचे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवराय यांच्यासारखे लोक मला काँग्रेस सोडूनच जायला हवे होते, कारण हेमंत विश्वशर्मांचे राजकारण करण्याची पद्धत काँग्रेसच्या राजकारणाशी मिळती जुळती नव्हतीच, त्यामुळे ते सोडून गेले तेच बरे झाले, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले, पण त्याचवेळी त्यांनी काँग्रेसला पश्चिम बंगाल मधून हुसकावून लावणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विषयी मात्र जपून वक्तव्य केले.
ममतांनी बंगालमध्ये “इंडिया” आघाडी मोडीत काढली. लोकसभेच्या बंगाल मधल्या 42 जागांपैकी काँग्रेसला फक्त 2 जागा देऊ केल्या. त्यामुळे काँग्रेस संतप्त होऊन ममतांपासून स्थानिक नेते बाजूला झाले,पण राहुल गांधी मात्र आजही ममता बॅनर्जींना “इंडिया” आघाडीचा पार्टनर मानत असल्याचे दिसून आले. ममता बॅनर्जी आणि काँग्रेस आजही “इंडिया” आघाडीचाच घटक आहेत. फक्त जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आणि येत्या काही दिवसांत ही चर्चा पूर्ण होऊन जागावाटप झालेले दिसेल, असे बचावात्मक वक्तव्य राहुल गांधींनी केले.
मात्र हेमंत विश्वशर्मा आणि मिलिंद देवरा यांच्यावर राहुल गांधी संतापलेले दिसले. हे दोन्ही नेते सोडून गेले ते बरेच झाले, कारण भाजपशी आमची वैचारिक लढाई आहे आणि या वैचारिक लढाईत हेमंत विश्वशर्मा आणि मिलिंद देवरा यांच्यासारखे नेते आम्हाला उपयोगी नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.
हे तेच हेमंत विश्वशर्मा आहेत, की जे काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींना भेटायला दिल्लीला गेले होते राहुल गांधी त्यांना तिथे भेटले त्यांनी राहुल गांधींना काँग्रेस मधली काही गाऱ्हाणी सांगितली. पण काँग्रेस मधली गाऱ्हाणी ऐकण्याऐवजी राहुल गांधींनी आपल्या कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालणे पसंत केले होते. राहुल गांधींच्या या वर्तणुकीमुळे हेमंत विश्वशर्मा चिडले आणि त्यानंतर ते भाजपमध्ये आले भाजपने त्यांना आसामचे मुख्यमंत्री केले. यामुळे राहुल गांधींचा संताप झाला. तो संताप आज पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यातून समोर आला.
लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल यांच्यासह गांधी कुटुंबीयांची देखील चौकशी झाली, पण ते भाजपच्या दबाव पुढे झुकले नाहीत, पण नितीश कुमार मात्र भाजपच्या दबावापुढे झुकून त्यांच्याकडे निघून गेले, असे शरसंधान राहुल गांधींनी साधले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App