विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना काँग्रेसने या बोटावरची त्या बोटावर केली!! आपली अनेक वर्षांपासूनची भूमिका बदलली.
काही वर्षांपूर्वी 2009 मध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले होते, या देशातल्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यांक मुस्लिमांचा आहे, आज राहुल गांधी म्हणाले, या देशावर पहिला अधिकार आदिवासींचा आहे. मनमोहनसिंग यांच्या वक्तव्याचे पडसाद देशपातळीवर उमटले होते. काँग्रेसला त्याची फार मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली होती.
North Korea : रशिया-युक्रेन युद्धात सामील होऊ शकतो उत्तर कोरिया; दोन्ही देशांत झाला संरक्षण करार
आज राहुल गांधी यांनी नंदूरबार मधल्या सभेत बोलताना या देशावर पहिला अधिकार आदिवासींचा आहे. आदिवासी या देशाचे पहिले मालक आहेत. देशात आदिवासींची लोकसंख्या 8 % आहे, तर त्यांची भागीदारी पण 8 % असली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आदिवासींना वनवासी म्हणतात. पण त्यांचे अधिकार, जल, जंगल, जमीन काढून घेऊन ते उद्योगपतींना देतात. ते माझ्या हातातले संविधान कोरं म्हणतात, कारण त्यांनी ते वाचलेलंच नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
पण राहुल गांधींच्या आजच्या भाषणामुळे काँग्रेसने या बोटावरची त्या बोटावर केली. भूमिका बदलली, अशी चर्चा महाराष्ट्रासह देशातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App