वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी पक्षांच्या खासदारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून विजय चौकापर्यंत मोर्चा काढला या मध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत सामील झाले होते. पण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी राहुल गांधीं बरोबर मोर्चात सहभागी होण्याऐवजी संसदीय कामकाजात लोकसभा आणि राज्यसभेत सहभागी होणे पसंत केले. Rahul Gandhi leads morcha of all opposition MPs, but TMC MPs maintain distance
राहुल गांधी हे विरोधकांना घेऊन मोर्चा काढत होते, पण तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय आहे हे राज्यसभेत कामकाजात सहभागी झाले होते. यातून विरोधकांचे ऐक्य दिसण्याऐवजी विरोधकांमधील फूटच स्पष्ट झाली.
राज्यसभेतील 12 खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या कामकाजात सहभागी होत नाहीत. विरोधक जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवू पाहत आहेत. परंतु त्यांना परवानगी दिली जात नाही. संसदेत एकामागून एक विधेयके संमत होत आहेत. त्यावर चर्चा देखील घेतली जात नाही. हे संसदीय लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पण तुमच्याबरोबर तृणमूल काँग्रेसचे खासदार का नाहीत?, हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तरही दिले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App