नाशिक : राहुल गांधी बड्या उद्योगपतींकडे लग्नाला नाही जात, ते शेतकरी कुटुंबाच्या लग्नात जातात, अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्यावर लाईन मारत असल्याचे राजकीय वास्तव समोर आले. Rahul Gandhi
– राहुल गांधींची लग्नात हजेरी
राहुल गांधींनी आज हरियाणातील संजय सिंग यांच्या तनु नावाच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावली. राहुल गांधी संजय सिंग यांच्या गोहाना जिल्ह्यातील मदिना या गावात खास लग्नासाठी गेले. तिथे त्यांनी संजय सिंग यांच्या कुटुंबीयांबरोबर सुमारे तासभर घालविला. लग्नाची मिठाई खाल्ली तिथे असलेल्या सगळ्यांशी गप्पागोष्टी केल्या. फोटोसेशन केले. संजय सिंग यांनी हरियाणवी पांढरा फेटा बांधून राहुल गांधींचा सत्कार केला. यावेळी राहुल गांधी यांच्या समवेत रोहतकचे खासदार दिपेंद्र सिंह हुड्डा होते. संजय सिंग यांचे भाऊ बलजीत सिंग हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतः राहुल गांधींच्या घरी जाऊन त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण राहुल गांधी यांनी स्वीकारून आज तनुच्या लग्नाला हजेरी लावली.
Rahul Gandhi didn't go to industrialist family wedding but attended the marriage function at a farmer's family in Haryana today. His bonding with ordinary people is truly remarkable. pic.twitter.com/D8OmpsHept — Sanjay Raut (@rautsanjay61) March 10, 2026
Rahul Gandhi didn't go to industrialist family wedding but attended the marriage function at a farmer's family in Haryana today. His bonding with ordinary people is truly remarkable. pic.twitter.com/D8OmpsHept
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 10, 2026
– इव्हेंटची पब्लिसिटी
या सगळ्या कार्यक्रमाचे फोटो राहुल गांधींनी आणि काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर करून राहुल गांधींना शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे दाखवून दिले. पण स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी या असल्या कार्यक्रमाचे फोटो स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करणे यात विशेष काही घडले नाही कारण सर्वसामान्यपणे कुठलाही नेता एखाद्या छोट्या मोठ्या इव्हेंटला हजर राहिला, तर तो नेता आणि त्याचा पक्ष त्या इव्हेंट पब्लिसिटी करतच असतो.
– संजय राऊतांनी मारली राहुल गांधींवर लाईन
पण त्या पलीकडे जाऊन संजय राऊत यांच्यासारख्या शिवसेनेच्या खासदारांनी राहुल गांधींच्या कौतुकासाठी स्वतःच्या सोशल मीडिया हँडल वरून हरियाणातल्या लग्नाचे फोटो शेअर केले. राहुल गांधी हे कुठल्या बड्या उद्योगपतींच्या घरच्या लग्नाला जात नाहीत पण शेतकरी कुटुंबातल्या लग्नाला जातात, अशा शब्दांमध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यामुळेच राजकीय संशयाची पाल चुकचुकली. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवारांना राज्यसभेवर पाठविले, आता उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवायचे असेल, तर काँग्रेसच्या मतांची गरज आहे म्हणूनच संजय राऊत यांनी राहुल गांधींचे लग्नातले फोटो शेअर करून त्यांच्यावर राजकीय लाईन मारली
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App