लोकसभेतले विरोधी पक्षनेते बनून राहुल गांधी ठरत आहेत जनता राजवटीतले गृहमंत्री “चरण सिंग”!!

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल केलेले हिंदू विरोधी भाषण आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेत दिलेले प्रत्युत्तर याचा बारकाईने आढावा घेतला, तर राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनून जनता पक्षाच्या राजवटीतले गृहमंत्री “चरण सिंग” ठरतात की काय??, अशी दाट शंका यायला लागली आहे. Rahul Gandhi giving chance to PM Modi as charan Singh gave it indira Gandhi

वास्तविक चरण सिंगांचे नातू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. त्यामुळे चरण सिंगांचे खरे वारसदार मोदींबरोबर आहेत, पण तरी देखील राहुल गांधी आपल्या राजकीय वर्तणुकीतून जनता राजवटीतले गृहमंत्री चरण सिंग ठरतील, असे म्हणण्यामागचा नेमका अर्थ काय??, याचा विचार केल्यानंतर थोडे इतिहासात डोकवावे लागेल.

चौधरी चरण सिंग हे जनता राजवटीत पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव करून जनता राजवट आल्यानंतर त्या राजवटीने चरण सिंग यांच्याच आग्रहाखातर इंदिरा गांधींना अटक केली होती. त्यानंतर इंदिरा गांधींची सगळी राजकीय चक्रे फिरली. इंदिरा गांधींनी आपल्या करिष्म्याच्या बळावर अवघ्या 3 वर्षांमध्ये पुन्हा सत्ता काबीज केली. याला चौधरी चरण सिंग यांची गृहमंत्री म्हणून त्यानंतर पंतप्रधान म्हणून ढिसाळ कारकीर्द कारणीभूत ठरली. चौधरी चरण सिंग यांनी इंदिरा गांधींच्या अटकेचे प्रकरण नीट हाताळलेच नाही. त्यांना राजकीय पुनरागमन करण्याची संधी दिली आणि इंदिरा गांधींसारख्या चाणाक्ष नेतृत्वाने त्या संधीचा पुरेपूर लाभ उठवत नुसते राजकारणात पुनरागमन केले असे नाही, तर त्या पुन्हा देशाच्या सत्तेवर आरुढ झाल्या.



नेमके इथेच राहुल गांधी विरोधी पक्षनेता बनून हिंदू विरोधी भाषण करून मोदींना खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सत्तेवर मांड ठोकण्याची संधी देत असल्याचे दिसून येत आहे. राहुल गांधींनी काल हिंदू विरोधी भाषण केल्याबरोबर आज सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक मोदींनी घेतली. त्या बैठकीत राहुल गांधींच्या विरोधात सूर उमटला. हिंदुत्वाचे राजकारण न करणारे पक्ष देखील मोदींच्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या पाठीशी उभे राहिले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फेविकॉल लावून ते घट्ट करण्याचे काम राहुल गांधींच्या एका भाषणे केले.

वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपकडे स्वतःचे बहुमत नाही. तरी देखील राहुल गांधींच्या कालच्या आक्रस्ताळ्या भाषणाने मोदींना जोरदार पलटवार करण्याची संधी लोकसभेत मिळाली आणि त्याचवेळी त्यांनी अत्यंत चतुराईने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले हिंदुत्वाचे राजकारण न करणारे तेलुगु देशम, धर्मनिरपेक्ष जनता दल, संयुक्त जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्ष देखील आपल्या बाजूने वळवून घेतले. ही राहुल गांधींच्या हिंदू विरोधी भाषणाची “राजकीय किमया” ठरली. या अर्थाने राहुल गांधी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणून चौधरी चरण सिंग यांचीच भूमिका पार पाडत आहेत, असे दिसते. आता लोकसभेत त्यांच्या रांगेत बसून अखिलेश यादव हे “राजनारायण” होणार का??, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Rahul Gandhi giving chance to PM Modi as charan Singh gave it indira Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात