राहुल गांधींनी लोकसभा सोडताना फ्लाईंग किस दिला आणि सोशल मीडियावर #pappu परतुनी आला!!


नाशिक : राहुल गांधींनी लोकसभेत अविश्वास ठरावावर जोरदार भाषण केले. लोकसभेच्या इतिहासाचा कोणी केला नव्हता, असा भारतमातेची हत्या केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. पण त्यापुढे जाऊन राहुल गांधींनी चक्क लोकसभा सदस्यांना फ्लाईंग किस दिला आणि सोशल मीडियावर #pappu परतुनी आला!! Rahul Gandhi gave a flying kiss while leaving the Lok Sabha

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी नव्या असलेल्या सोशल मीडियात मोदी समर्थकांनी अत्यंत चलाखीने राहुल गांधींना “पप्पू” संबोधले होते. 2014 चे निकाल लागले आणि राहुल गांधींचा पप्पू निगेटिव्हली हिट झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 2019 पर्यंत अनेक वेळा राहुल गांधींना “पप्पू” म्हणून हिणवले गेले. त्यांची वेगवेगळी भाषणे, त्याच्या क्लिप्स पप्पूच्या म्हणून फिरवल्या गेल्या. शेवटी राहुल गांधींनी भर लोकसभेत मै पप्पू हूँ!!, अशी कबुली दिली. पण माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, अशी मोदींवर गुगली टाकून पाहिली. पण मोदींनी त्या गुगली वर देखील षटकार ठोकला आणि 2019 च्या निवडणुकीत 2014 पेक्षा जास्त जागा मिळवून पुन्हा सत्तारूढ झाले.

दरम्यानच्या काळात राहुल गांधींची इमेज बदलली. त्यांनी भारत जोडो यात्रा केली. देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवले. त्यांना 2 वर्षांची शिक्षा झाली. त्यांची खासदारकी गेली. पण सुप्रीम कोर्टाने शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे त्यांची खासदारकी बचावली. ते लोकसभेत परत आले आणि आज त्यांनी भाषण केले. मोदी सरकारने भारतमातेची मणिपूरमध्ये हत्या केल्याचा आरोप त्यांनी आपल्या भाषणात केला आणि भाषण संपवून बाहेर जाताना त्यांनी लोकसभा सदस्यांकडे पाहून फ्लाईंग किस दिला. शोभा करंदलजे, हेमामालिनी आणि 22 महिला खासदारांनी राहुल गांधींच्या असभ्य वर्तनाविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर #pappu परत आला. पप्पूची मीम्स फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम या सोशल मीडियावर फिरायला लागली.

गेली सुमारे 2.5/3 वर्षे “पप्पू” सोशल मीडियातून गायब झाला होता. 3000 किलोमीटरची भारत जोडो यात्रा केल्यानंतर राहुल गांधी काहीतरी गंभीर राजकारण करतील, असे वाटू लागले होते. पण तेवढ्यात त्यांनी आज लोकसभेत भाषण केले आणि त्यानंतर फ्लाईंग किस दिला आणि मोरू परतुनी आला, या धर्तीवर सोशल मीडियावर #पप्पू परतुनी आला!!…आणि मोदी समर्थकांना हायसे वाटले…!!

Rahul Gandhi gave a flying kiss while leaving the Lok Sabha

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*