No Confidence Motion: ‘अविश्वास प्रस्तावाचा उद्देश केवळ भ्रम पसरवणे’, अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा!

स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान मोदींचे सरकार हे एकमेव सरकार आहे, ज्याने सर्वाधिक लोकांचा विश्वास जिंकला, असेही म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर दुसऱ्या दिवशीही संसदे प्रचंड गदारोळ दिसून आला. आजही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार वादावादी सुरू होती. लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला, तर स्मृती इराणी यांनी सरकारच्या वतीने चर्चेत भाग घेत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. No Confidence Motion The purpose of no confidence motion is only to spread illusion Amit Shah targets the opposition

अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संसदेत विरोधकांना टोला लगावला. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान मोदींचे सरकार हे एकमेव सरकार आहे ज्याने सर्वाधिक लोकांचा विश्वास जिंकला. पंतप्रधान मोदी हे लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधान मोदी नेहमीच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतात. एकही रजा न घेता ते दिवसाचे १७ तास सतत काम करतात. जनता मोदींच्या पाठीशी उभी आहे.

आम्ही शेतकर्‍यांना जे दिले ते फुकट नाही तर त्यांना स्वावलंबी बनवले आहे. ते (यूपीए) शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे सांगत असतात. आमचा नुसता कर्ज माफ करण्यावर विश्वास नाही, तर अशी व्यवस्था निर्माण करण्यावर विश्वास आहे जिथे कोणीही कर्ज घेऊ नये. पंतप्रधान मोदी सरकारने काही ऐतिहासिक निर्णय घेऊन घराणेशाही आणि भ्रष्टाचार संपवला. यूपीएचे चारित्र्य सत्तेचे रक्षण करणे आहे, परंतु एनडीए तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी लढते.

ते (यूपीए) जनधन योजनेला विरोध का करत होते हे समजून घ्यावे लागेल? माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की केंद्राकडून 1 रुपया पाठवला जातो तेव्हा फक्त 15 पैसे लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात… पण आज ही संपूर्ण रक्कम गरिबांपर्यंत पोहोचते.

No Confidence Motion The purpose of no confidence motion is only to spread illusion Amit Shah targets the opposition

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात