जाणून घ्या, हे दानशूर व्यक्ती नेमके कोण आहेत आणि त्यांनी काय म्हटले आहे?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातील फायनान्स क्षेत्रातील नावाजलेल्या श्रीराम ग्रुपचे संस्थापक आणि गणितज्ञ आर त्यागराजन(वय-८६) यांनी तब्बल ६ हजार कोटींची संपत्ती दान दिली आहे. स्वत:साठी केवळ एक स्वस्त कार आणि एक छोटेसे घर सोडले त्यांनी राहू दिले आहे, विशेष म्हणजे त्यागराजन यांच्याकडे मोबाईल फोनही नाही. R Tyagaraj donated wealth worth six thousand crores to employees
ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत त्यागराजन यांनी सांगितले की, मी ७५० दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास ६ हजार २१० कोटी रुपये दान केले आहेत, परंतु ही नवीन गोष्ट नाही. ‘मी थोडा डाव्या विचारसरणीचा आहे, परंतु अडचणींमध्ये सापडलेल्या गुंतलेल्या लोकांच्या आयुष्यातून काहीतरी वाईट काढून टाकायचे आहे.’’
श्रीराम फायनान्स ही भारतातील अग्रगण्य नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) पैकी एक आहे जी वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज यासारख्या विविध प्रकारच्या कर्जांची ऑफर देते. यासोबतच कंपनी विमाही देते. एका अहवालानुसार, सध्या या ग्रुपमध्ये जवळपास १ लाख ५० हजार कर्मचारी आहेत. श्रीराम ग्रुपची सुरूवात ५ एप्रिल १९७४ रोजी चिटफंड व्यवसायाने झाली आणि नंतर समूहाने कर्ज आणि विमा व्यवसायात प्रवेश केला.
तसेच, गरिबांना कर्ज देणे हा समाजवादाचा एक प्रकार आहे. क्रेडिट इतिहास आणि नियमित उत्पन्न नसलेल्या लोकांना कर्ज देणे जितके मानले जाते तितके धोकादायक नाही हे सिद्ध करण्यासाठी मी वित्त उद्योगात आलो आहे.आम्ही लोकांना परवडणाऱ्या दरात कर्ज देण्याचा प्रयत्न केला आहे. असंही त्यागराजन म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App