अमित शाहांच्या संसदीय भाषणाने शास्त्रीजींसह वाजपेयी, सुषमा स्वराज यांची रेकॉर्ड मोडली!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जे भाषण केले, त्याने आत्तापर्यंतची संसदीय भाषणांची सर्व रेकॉर्ड मोडली. amit shah speech all record break

  • अमित शाह यांचे संसदेतील हे ऐतिहासिक भाषण ठरले. त्यांनी लोकसभेतील आजच्या भाषणातून सर्व विक्रम मोडीत काढले.
  • अविश्वास प्रस्तावावरील चर्चेतील हे सर्वांत मोठे संसदीय भाषण ठरले. अमित शाह यांनी 133 मिनिटांचे म्हणजे 2 तास 13 मिनिटांचे उत्तराचे भाषण केले.
  • अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण वगळता, संसदेत मंत्री किंवा नेत्याचे हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे भाषण ठरले.
  • अमित शहांनी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचा विक्रम मोडला. त्यांनी शास्त्रीजींपेक्षा 1 मिनिट जास्त वेळ घेतला.
  • 1965 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी अविश्वास प्रस्तावावर 2 तास 12 मिनिटांचे भाषण केले होते.
  • तिसरे सर्वात मोठे भाषण 2003 मध्ये सुषमा स्वराज यांचे होते. सुषमा स्वराज यांनी पूर्ण 105 मिनिटे म्हणजे 1 तास 45 मिनिटे भाषण केले होते.
  • चौथ्या क्रमांकावरील अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण ९० मिनिटांचे म्हणजेच १ तास ३० मिनिटांचे होते. 1996 मध्ये त्यांनी संसदेत आपल्या 13 दिवसांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडताना हे भाषण केले होते.
  • अविश्वास ठरावावर उत्तर देण्याबाबत केंद्रातील भाजप आघाडी सरकार किती गंभीर आहे, हेच अमित शाह यांच्या भाषणातून दिसून आले.

amit shah speech all record break

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात