‘जनतेसोबत घृणास्पद विनोद सुरू आहे’, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल


 

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरील वाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि देशातील लोकांसोबत घृणास्पद विनोद सुरू असल्याचा आरोप केला. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींविषयी त्यांनी ट्विट केले, “केंद्र सरकार आमच्या लोकांशी घृणास्पद विनोद करत आहे. किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.Rahul Gandhi Criticizes Modi Government Says Government of india is playing a cruel joke on our public


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरील वाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि देशातील लोकांसोबत घृणास्पद विनोद सुरू असल्याचा आरोप केला. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींविषयी त्यांनी ट्विट केले, “केंद्र सरकार आमच्या लोकांशी घृणास्पद विनोद करत आहे. किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.


Rahul Gandhi : राहुल गांधींवर ट्विटरकडून कारवाई ; ‘त्या’ ट्विटमुळे अकाऊंट केलं लॉक


सलग दुसऱ्या दिवशी इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. सरकारी किरकोळ इंधन विक्रेत्यांच्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार, दिल्लीत पेट्रोलची किंमत विक्रमी 106.54 रुपये प्रति लीटर आणि मुंबईत 112.44 रुपये प्रति लीटर झाली आहे. मुंबईत डिझेल आता 103.26 रुपये प्रति लीटरने उपलब्ध आहे, तर दिल्लीमध्ये 95.27 रुपये प्रति लीटर आहे.

राहुल-प्रियांका यांची यापूर्वीही केंद्रावर टीका

या अगोदरही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केल्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटले होते की, पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की, आता हवाई चप्पल आणि मध्यम वर्गातील लोकांना रस्त्यावर प्रवास करणेदेखील कठीण झाले आहे. एक बातमी शेअर करताना राहुल गांधी यांनी ट्वीट केले होते, “हा एक अतिशय गंभीर मुद्दा आहे. निवडणुका-मतांच्या-राजकारणापूर्वी, जनतेच्या साध्या गरजा येतात, ज्या आज पूर्ण होत नाहीत. मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी ज्या लोकांची फसवणूक होत आहे त्यांच्यासोबत मी आहे आणि आवाज उठवत राहीन.”

प्रियांका गांधींचे ट्विट

प्रियांका गांधी यांनीही एक बातमी शेअर करताना ट्वीट केले होते, “वचन दिले होते की हवाई चप्पलवाले विमानाने प्रवास करतील. पण भाजप सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतक्या वाढवल्या आहेत की आता हवाई चप्पलवाले आणि मध्यमवर्गीयांना रस्त्यावरून प्रवास करणेही कठीण झाले आहे. पेट्रोल आता विमानाच्या इंधनापेक्षाही महाग झाले आहे.”

Rahul Gandhi Criticizes Modi Government Says Government of india is playing a cruel joke on our public

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात