विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात जातीय धृवीकरण होऊन मुस्लिम व्होट बँक काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिल्यानंतर 99 खासदारांचा पल्ला गाठणाऱ्या काँग्रेसला अचानक आपण “हिंदू” असल्याचा साक्षात्कार झाला तो साक्षात्कार दुसऱ्या तिसऱ्या कोणाला झाला नसून तो दस्तुरखुद्द लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्यांना झाला. त्यांनी लोकसभेमध्ये भगवान शंकराचा फोटो दाखवून आपण हिंदू असल्याचा साक्षात्कार सगळ्या लोकसभेला सांगितला. Rahul Gandhi alleged Modi is not true hindu in loksabha
त्याचे झाले असे :
राहुल गांधींचे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणून आज पहिले भाषण झाले. त्यावेळी मोदी सरकारचे वाभाडे काढताना राहुल गांधींनी आयडियाची कल्पना लढवली. त्यांनी भगवान शंकर, गुरुनानक, जीजस ख्राईस्ट यांचे फोटो सभागृहात दाखवले ही सगळे अहिंसेचे समर्थक होते. त्यांनी देशाला सहिष्णुता शिकवली. त्यांच्यामुळेच महात्मा गांधींनी देशात अहिंसेची शिकवण रुजवली, असे सांगितले.
पण एवढेच सांगून राहुल गांधी थांबले नाहीत. काँग्रेस सह आम्ही सगळे विरोधक भगवान शंकराचे गुरुनानकांचे भक्त आहोत त्यामुळे आम्ही खरे हिंदू आहोत नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक हे खरे हिंदूच नाहीत असा “जावईशोध” राहुल गांधींनी लावला. हिंदू धर्मा आम्हाला अहिंसा आणि सहिष्णुता शिकवतो पण तुम्ही हिंदू धर्माच्या बाता करून फक्त देशात नफरत फैलावता. हिंसक मार्गाने विरोधकांचा आवाज बंद करता. असत्य मार्गाने चालता, असा आरोप राहुल गांधींनी केला अभय मुद्रा अर्थात हाताचा पंजा दाखवून डरो मत डराओ मत, असा मोठ्या प्रवचनकाराच्या थाटात “संदेश” दिला.
पण हे सगळे करताना राहुल गांधींनी नियमभंग केला. संसदेमध्ये कुठलेही पोस्टर फोटो फडकविणे नियमबाह्य आहे. राहुल गांधींनी भगवान शंकर, गुरु नानक, जीजस यांचे फोटो दाखवा नियमाचा भंग केला. त्यामुळे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना समज दिली. भाजपचे खासदारही चिडले. राहुल गांधींनी काँग्रेस सह सगळी विरोधक हिंदू असल्याचा दावा केला, पण त्याचवेळी नरेंद्र मोदींवर नाव घेऊन ते खरे हिंदू नसल्याचा आरोप केला. या आरोपाला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अमित शाह यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. भाजप खासदारांनी जोरदार प्रतिहल्ला चढवून राहुल गांधींच्या भाषणाचे वाभाडे काढले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App