टी-20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार असून राहुल द्रविडने आता अधिकृतपणे या पदासाठी अर्ज केला आहे. राहुल द्रविडने मंगळवारी भारतीय मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. दरम्यान, टी-20 वर्ल्ड कप 2021 नंतर सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे आणि त्यांच्या जागी राहुल द्रविड येणार असल्याचे मानले जात आहे. याआधी राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक बनण्यास तयार नव्हता, परंतु बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दीर्घ संभाषणानंतर त्यांचे मन वळवले.Rahul Dravid has officially applied for the post of Indian cricket team’s head coach
वृत्तसंस्था
मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार असून राहुल द्रविडने आता अधिकृतपणे या पदासाठी अर्ज केला आहे. राहुल द्रविडने मंगळवारी भारतीय मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला.
दरम्यान, टी-20 वर्ल्ड कप 2021 नंतर सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे आणि त्यांच्या जागी राहुल द्रविड येणार असल्याचे मानले जात आहे. याआधी राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक बनण्यास तयार नव्हता, परंतु बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दीर्घ संभाषणानंतर त्यांचे मन वळवले.
राहुल द्रविड नुकताच टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. जिथे त्यांनी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला. मात्र, टी-20 मालिकेत भारताच्या अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाचा फटका बसला, त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.
टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडकडून होम सीरिज खेळायची आहे आणि तिथून राहुल द्रविड टीमची धुरा सांभाळू शकतो. मुख्य प्रशिक्षकापेक्षा राहुल द्रविडची भूमिका अधिक असू शकते, अशा बातम्याही येत आहेत. वास्तविक राहुल द्रविडने अनेक वर्षे भारताच्या ज्युनियर खेळाडूंसाठी काम केले आहे. राहुल द्रविडने अंडर-19 संघासाठी विश्वचषक जिंकला आहे
आणि भारत अ संघातील खेळाडूंच्या विकासासाठी खूप काम केले आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतरही राहुल द्रविड भारत-अ आणि अंडर-19 संघांवर लक्ष ठेवेल, असे मानले जात आहे. द्रविड या संघांच्या प्रशिक्षकांचा प्रमुखही बनू शकतो.
किती असेल मानधन?
मुख्य प्रशिक्षकापेक्षा द्रविडची भूमिका मोठी असेल, तर त्याचा पगारही जास्त असेल. टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बीसीसीआय साडेआठ कोटी रुपये देते, मात्र द्रविडला त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळत आहे. बीसीसीआय द्रविडला 10 कोटी रुपये मानधन देऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App