लाल डगला घालून 4 व्हीलर बॅग डोक्यावर घेऊन दिल्लीत राहुल बनले कुली!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आपला समाजातल्या सर्व स्तरांमधल्या घटकांमध्ये कनेक्ट आहे, हे दाखविण्याची हौस भागवत राहुल गांधी आज लाल डगला घालून कुली बनले, पण त्यांनी 4 व्हीलर बॅग डोक्यावर घेतल्यामुळे सोशल मीडियात ट्रोल झाले. Rahul became a porter in Delhi with a 4 wheeler bag on his head

राहुल गांधी आज दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तिथल्या कुलींशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना दिवसाला रोजगार किती मिळतो?, त्यांच्यासाठी सरकारने कोणत्या सोयी सुविधा केल्या आहेत का?, याची माहिती राहुल गांधींनी या कुलींकडून जाणून घेतली.


‘पत्रकारांवर नव्हे तर राहुल गांधींवर बहिष्कार टाका’ भाजपाचा काँग्रेसला टोला!


या कुलींनी एक व्हिडिओ शेअर करून राहुल गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा राहुल गांधींनी आज पूर्ण केली. एका कुलीचा लाल डगला देखील त्यांनी घातला. पण त्यापुढे जाऊन कुली जशी प्रवाशांची जड बॅग डोक्यावर घेऊन रेल्वे गाडी गाठतात, तसा राहुल गांधींनी देखील प्रयत्न केला. एक बॅग उचलून त्यांनी डोक्यावर ठेवली.

पण नेमकी ती बॅग चार चाकांची म्हणजे 4 व्हीलर बॅग निघाली. राहुल गांधींचा तो फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे सोशल मीडियात ते जोरदार ट्रोल झाले. व्हीलची बॅग डोक्यावर घेऊन कोणी धावपळ करतो का?? प्लॅटफॉर्मवरून व्हीलची बॅग चालवत नेतात ना!! राहुल गांधींना कुलीचाच लाल डगला घालायचा होता, तर तो डगला घालून राहुल गांधींनी फोर व्हीलर बॅग प्लॅटफॉर्मवरून चालवत न्यायची होती, असा टोला अनेक नेटिझन्सनी त्यांना लगावला. त्यामुळे राहुल गांधींच्या बाबतीत करायला गेले एक आणि झाले भलतेच असे घडले.

Rahul became a porter in Delhi with a 4 wheeler bag on his head

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात