मोदींनी आव्हान दिल्यानंतर बाळासाहेबांची आठवण काढली; पण “हिंदुहृदयसम्राट” शब्द सोडून भाऊ – बहीण बाकीचंच बोलली!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आव्हान दिल्यानंतर बाळासाहेबांची आठवण काढली; पण “हिंदूहृदयसम्राट” शब्द सोडून बाकीचंच बहीण – भावंड बोलली!!Rahul and priyanka remembers balasaheb thackeray, but didn’t utter the word “Hindurihdaysamrat”!!

याची कहाणी अशी :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नाशिक आणि मुंबईच्या सभांमध्ये उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते, तुमच्यात हिंमत असेल, तर काँग्रेसच्या युवराजाच्या तोंडून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि “हिंदुहृदयसम्राट” बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी दोन चांगले उद्गार काढवून दाखवा.



हे आव्हान बरेच दिवस झाले तरी उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधींनी स्वीकारले नाही, पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात प्रचारादरम्यान काल प्रियांका गांधींनी कोल्हापूरच्या सभेत बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आमचे मतभेद होते. परंतु, बाळासाहेब आणि काँग्रेस यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला नाही, हा आमच्यातला “कॉमन फॅक्टर” असल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या.

बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राहुल गांधींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांची आठवण जरूर काढली. पण राहुल गांधींनी फक्त 12 व्या पुण्यतिथीनिमित्त बाळासाहेब ठाकरेजी यांची आठवण येते. माझे विचार उद्धवजी, आदित्य आणि संपूर्ण शिवसेना कुटुंबाशी जोडले गेलेत, एवढेच लिहिले.

यात एकतर बाळासाहेबांची आठवण काढावी, यासाठी मोदींना आव्हान द्यावे लागले. त्यांनी आव्हान दिल्यानंतर गांधी बहीण – भावाने बाळासाहेबांची जी आठवण काढली, त्यात त्यांनी खुद्द बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाविषयी काहीच उद्गार काढले नाहीत, जाता जाता पुसटचा उल्लेख करावा तेवढ्यापुरतेच दोघांनी बोलले किंवा लिहिले, पण त्या पलीकडे जाऊन पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांना जे मूळ आव्हान दिले होते, की त्यांनी काँग्रेसच्या युवराजच्या तोंडून “हिंदुहृदयसम्राट” बाळासाहेब ठाकरे एवढे म्हणवून घ्यावे, ते आव्हान तर गांधी बहीण भावंडांनी आणि उद्धव ठाकरेंनी पेललेच नाही!! राहुल किंवा प्रियांका यांनी बाळासाहेबांचा उल्लेख “हिंदुहृदयसम्राट” असा केलाच नाही.

Rahul and priyanka remembers balasaheb thackeray, but didn’t utter the word “Hindurihdaysamrat”!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात