वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टराई यांनी मंगळवारी भारताच्या नवीन संसद भवनातील अखंड भारत भित्तीचित्रावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, भित्तीचित्रे शेजारी देशात प्राचीन भारतीय कल्पनांचा प्रभाव दर्शविते, ज्यामुळे अनावश्यक आणि हानिकारक राजनयिक विवाद होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झालेल्या संसदेच्या नवीन इमारतीतील भित्तिचित्रे भूतकाळातील महत्त्वाची साम्राज्ये आणि शहरे दर्शवितात.Question on the mural of unbroken India made in the new Parliament House, former PM Bhattarai of Nepal expressed concern
नेपाळी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भट्टराई यांची टिप्पणी नेपाळमधील कपिलवस्तु आणि लुंबिनीचे चित्रण केल्यानंतर आली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष भट्टराई यांनी ट्विटरवर इशारा दिला की, भित्तीचित्रामुळे नेपाळसह शेजारी राष्ट्रांमध्ये अनावश्यक आणि हानिकारक राजनैतिक वाद निर्माण होऊ शकतात. ते म्हणाले की यामुळे भारताच्या बहुतेक जवळच्या शेजारी देशांमधील द्विपक्षीय संबंध बिघडू शकतात. यामुळे परस्पर विश्वासात घट होऊ शकते. भित्तिचित्रांचा खरा हेतू आणि परिणाम याबद्दल भारतीय राजकीय नेतृत्वाला वेळीच माहिती द्यावी, असेही ते म्हणाले.
काय आहे या भित्तिचित्रावर?
अखंड भारताच्या प्राचीन वैभवाचे प्रतीक म्हणून या भित्तिचित्राकडे पाहिले जाते. अफगाणिस्तानापासून ते सध्याच्या बांग्लादेशपर्यंत असलेला भारताचा तत्कालीन विस्तार यात दर्शवण्यात आला आहे. सर्व स्थळांची प्राचीन नावेही यात नमूद करण्यात आलेली आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App