वृत्तसंस्था
हिरोशिमा : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी उपस्थिती विषयी असमर्थता दर्शवल्याने ऑस्ट्रेलियातली रद्द झालेली नियोजित “क्वाड समिट” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने आज जपानमधल्या हिरोशिमात झाली. या बैठकीला मोदी यांच्या आग्रहातून ज्यो बायडेन उपस्थित राहिले.”Quad Summit” in Australia held in Hiroshima, Japan!!; Joe Biden in attendance with Prime Minister Modi
अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या या चार देशांनी एकत्र येऊन संरक्षण चतुष्कोन तयार केला आहे. त्यालाच “क्वाड” असे म्हणतात. हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यामध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी आणि चिनी वर्चस्ववाद मोडून काढण्यासाठी “क्वाड” संघटना कार्यरत आहे. या क्वाडची 2023 शिखर बैठक ऑस्ट्रेलियात नियोजित होती. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी उपस्थिती विषयी असमर्थता दर्शवल्याने ती रद्द झाली होती.
#WATCH जापान: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने हिरोशिमा में क्वाड देशों के राष्ट्राध्क्षों के साथ मुलाकात की। pic.twitter.com/8qeIqcFzwo — ANI_HindiNews (@AHindinews) May 20, 2023
#WATCH जापान: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने हिरोशिमा में क्वाड देशों के राष्ट्राध्क्षों के साथ मुलाकात की। pic.twitter.com/8qeIqcFzwo
— ANI_HindiNews (@AHindinews) May 20, 2023
पण जपानच्या हिरोशिमांमध्ये प्रगत जी 7 देशांचे प्रमुख जमले आहेत. त्याच बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण होते. ते जी 7 च्या बैठकीला हजर राहिलेच, पण त्याचबरोबर रद्द झालेली “क्वाड समिट” घ्यायचाही त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे जपानचे पंतप्रधान हिडो किशीदा यांनी ताबडतोब “क्वाड समिट” हिरोशिमात आयोजित केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, जपानचे पंतप्रधान हिडो किशीदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज उपस्थित राहिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App