तृप्ती देसाईंनी ‘राजकीय इनिंग’साठी का केली बारामतीचीच निवड?, पवार कुटुंबावर निशाणा!

‘’भाकरी फिरवली पाहिजे, पण मग…’’ असं म्हणत टोलाही लगावला!

विशेष प्रतिनिधी

पुणे :   आतापर्यंत समाजकार्यात, समाजातील विविध मुद्य्यांवर आक्रमकपणे लढणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी आता सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. एवढच नाहीतर त्यांनी आपल्या या नव्या राजकीय इनिंगच्या सुरुवातीसाठी थेट बारामतीचं मैदान निवडत, सुप्रिया सुळेंविरोधातच कंबर कसली आहे. मात्र त्यांनी असा धाडसी निर्णय का घेतला, याचा त्यांनी द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक सदरात  खुलासा केला आहे. Why did Trupti Desai choose Baramati for the innings of politics target Pawar family

तृप्ती देसाई म्हणल्या, ‘’माझं कार्यालय हे बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. खडकवासला मतदारसंघ हा बारामती लोकसभा क्षेत्रात येतो आणि मी इथली मतदारही आहे. याशिवाय, बारामतीचं कसं आहे की, जेव्हा २००९मध्ये सुप्रिया सुळे निवडणुकीला उभा होत्या, तेव्हा आम्हालाही निश्चितच आनंद झाला होती की एखादी महिला या मतदारसंघाला खासदार म्हणून मिळत आहे. त्यानंतर २०१४ व २०१९ मध्येही त्या लढल्या आणि २०२४ आल्यावर असं आम्हाला वाटलं की त्यांचं जे कोणी दहा-पंधरा वर्षे चांगलं काम करत आहे, मग कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असेल, जवळचा कार्यकर्ता असेल तो कदाचित पुढे येईल किंवा त्यांचे कोणी आमदार अथवा कोणी वेगळे उमेदवार असतील. परंतु  जेव्हा सुप्रिया सुळेच जेव्हा चौथ्या टर्मसाठी तयारी करतात, तेव्हा मग या घराणेशाहीच्या विरोधात कुठंतरी आपण बोललं पाहिजे, सर्वसामान्य लोक जी इतकी वर्षे त्यांच्या पक्षाचं काम करत आहेत, मग हे फक्त सतरंज्या उचलायलाच आहेत का?’’


…म्हणूनच ठरवलं की आता आपण राजकारणात जायचं तृप्ती देसाईंनी केला खुलासा!


याचबरोबर ‘’आपण जर पाहीलं, तर या अगोदर या मतदारसंघाचे खासदार शरद पवार होते, अजित पवारही एकवेळेस होते आणि त्यानंतर सुप्रिया सुळे.  परंतु सुप्रिया सुळेंच्या तीन टर्म झाल्या आहेत. आता सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की या मतदारसंघात परिवर्तन व्हावं. जसं शरद पवार म्हणाले की भाकरी फिरवली पाहिजे. पण मग भाकरी फिरवण्याची सुरुवात ही बारामती लोकसभेपासून पाहिजे. कारण,तीन टर्म झाल्या आहेत, चौथ्या टर्मला एखाद्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे.’’ असंही तृप्ती देसाईंनी सांगितलं आहे.

याशिवाय, ‘’आमचा सुप्रिया सुळेंना फार विरोध आहे असं नाही, पण त्यांनी काम काहीच केलेलं नाही. शरद पवारांची लेक ही प्रतिमा सोडली तर आपण पाहीलं असेल की सहा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतात. त्याच्या हद्दीत दोन-तीन आमदार त्यांच्या पक्षाचे आहेत, बाकी इतर पक्षाचे आहेत. परंतु त्यांचा कधीही दौरा असेल तर तो नगरसेवक कार्यक्रम आयोजित करतो, आमदार कार्यक्रम आयोजित करतो. स्वत:ची यंत्रणा किंवा स्वत: काही केलेलं आम्ही पाहीलेलं नाही. १५ वर्षे मतदारसंघ ताब्यात असल्यानंतर खडकवासलाचा विकास, ग्रामीण भागातील अनेक प्रश्न, देवस्थांनाचा प्रश्न, बारामती तालुका सोडला तर बाकीच्या मतदारसंघातील साधा पाणीप्रश्नही सोडवता आलेला नाही. म्हणजे मूलभूत गरजा सुद्धा सोडवता येत नाहीत. त्यामुळे लोकांची  इच्छा आहे की मी तिथे उभा रहावं. मला वाटतं की पवारांच्या घराण्याच्या विरोधात, चळवळीतील शक्ती त्यांचा पराभव करू शकते.’’ असं म्हणत तृप्ती देसाईंनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.

Why did Trupti Desai choose Baramati for the innings of politics target Pawar family

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात