काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांना पंजाब पोलिसांनी केली अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

काँग्रेसच्या शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षही आहेत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा उलाढाल पाहायला मिळत आहे. पंजाब पोलिसांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोलाथ विधानसभेचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी आज  सकाळी आमदार खैरा यांच्या चंदीगड येथील घरावर छापा टाकून अटक केली. Punjab Police caught Congress MLA Sukhpal Khaira

या कारवाईत महिला पोलिसही उपस्थित होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जलालाबाद पोलिसांनी एका जुन्या प्रकरणात आमदाराला अटक केली आहे. काँग्रेसच्या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सुखपाल खैरा पाहत आहेत.

काय आहे प्रकरण? –

प्राप्त माहितीनुसार, आमदार खैरा यांना एका जुन्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. 2015 मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात पंजाब पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप आहे. या कायद्यानुसार या प्रकरणात खैरा दोषी आढळल्यास त्यांना 1 वर्षापासून ते 20 वर्षांपर्यंतची कठोर शिक्षा होऊ शकते. यासोबतच एक लाख रुपयांच्या दंडाचीही तरतूद आहे.

Punjab Police caught Congress MLA Sukhpal Khaira

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात