Punjab Cabinet Expansion : पंजाबमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पंजाबमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता होईल. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन शपथविधीची वेळ मागितली. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात सात नवीन चेहऱ्यांना स्थान दिले जाऊ शकते. यासोबतच अमरिंदर सिंग सरकारमध्ये मंत्रिपदी असलेल्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Punjab Cabinet Expansion Tommorrow Sundey At 4 30 PM, these 7 new MLA Will Be In Cabinet
विशेष प्रतिनिधी
चंदिगड : पंजाबमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पंजाबमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता होईल. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन शपथविधीची वेळ मागितली. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात सात नवीन चेहऱ्यांना स्थान दिले जाऊ शकते. यासोबतच अमरिंदर सिंग सरकारमध्ये मंत्रिपदी असलेल्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते त्यामध्ये परगट सिंग, राज कुमार वेरका, गुरकीरत सिंग कोटली, संगत सिंग गिलजियन, कुलजीत सिंह नगर, राणा गुरजीत सिंग आणि अमरिंदर सिंग राजा वारिंग यांची नावे आहेत.
Punjab Chief Minister Charanjit Singh Channi reaches Raj Bhawan to meet Governor Banwarilal Purohit. pic.twitter.com/o5k7enDaKP — ANI (@ANI) September 25, 2021
Punjab Chief Minister Charanjit Singh Channi reaches Raj Bhawan to meet Governor Banwarilal Purohit. pic.twitter.com/o5k7enDaKP
— ANI (@ANI) September 25, 2021
ज्यांना आणखी एक संधी मिळू शकते, त्यांच्यात सुखजिंदर रंधावा (उपमुख्यमंत्री), ओपी सोनी (उपमुख्यमंत्री), मनप्रीत सिंग बादल, ब्रह्म मोहिंद्रा, त्रिपाट राजिंदर सिंह बाजवा, रझिया सुल्ताना, सुखबिंदर सिंग सरकारिया, भारत भूषण आशु, अरुणा चौधरी आणि विजय इंदर सिंगला यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
पंजाबमधील मंत्रिमंडळाबाबत गुरुवारी राहुल गांधी यांच्या घरी रात्री 10 ते 2 पर्यंत मंथन झाले. या उच्चस्तरीय बैठकीला राहुल गांधी, प्रियांका गांधी, पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत, केसी वेणुगोपाल आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी उपस्थित होते.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांना मंत्रिमंडळ रचनेवर चर्चा करण्यासाठी दिल्लीला खास बोलावले होते. ही बैठक अशा वेळी झाली जेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षनेतृत्वावर आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिद्धू यांच्यावर सडकून टीका केली. अमरिंदर सिंग यांना उत्तर देणे महागात पडू शकते हे पक्षश्रेष्ठींना माहिती आहे. म्हणूनच कॅप्टनने राहुल-प्रियांका यांना अननुभवी म्हणूनही पक्षाने अतिशय मवाळ प्रतिक्रिया दिली आहे.
Punjab Cabinet Expansion Tommorrow Sundey At 4 30 PM, these 7 new MLA Will Be In Cabinet
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App