वृत्तसंस्था
चंडीगड – पंजाबच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (ता. २६) सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. नव्या मंत्रिमंडळात सात नवीन चेहरे आहेत. मुख्यमंत्री चन्नी यांनी राज्यपालाची भेट घेतल्यानंतर शपथविधीची वेळ ठरवण्यात आली.Punjab cabinate will epand today
पंजाबच्या संभाव्य मंत्र्यांची नावे निश्चिहत झाली आहेत. जुन्या मंत्रीमंडळातील तर आठ जणांना मात्र संधी मिळाली आहे. मनप्रीत बादल, विजयेंद्र सिंगला, रझिया सुलताना, ब्रह्म मोहिंदरा, अरुणा चौधरी, भारतभूषण आशू, तृप्त राजिंदर बाजवा आणि सुख सरकारिया यांची वापसी होत आहे.
तसेच राजकुमार वेरका, परगतसिंग, संगत गिलजिया, गुरकिरत कोटली, कुलजित नाग्रा, राणा गुरजित आणि अमरिंदरसिंग राजा वडिंग यांचा नव्याने समावेश होत आहे. आधीच्या मंत्रिमंडळातील साधू सिंग धर्मसोत, बलवीर सिद्धू, राणा गुरमीत सोधी, गुरप्रीत कांगड, सुंदरश्यााम अरोरा या पाच जणांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. या सर्वावंर गैरव्यवहाराचे कोणते ना कोणते आरोप होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App