संपूर्ण देशात कोरोनाची लाट शिखरावर असताना शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा फिर दिल्ली चलोची घोषणा दिली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाने हा:हा:कार माजविला असताना पुन्हा शेतकरी गोळा झाले तर प्रचंड अनर्थ ओढविण्याची भीती व्यक्त केली जात आहे.Protesting farmers announce Delhi Chalo again while Corona wave is at its peak
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोनाची लाट शिखरावर असताना शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा फिर दिल्ली चलोची घोषणा दिली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाने हा:हा:कार माजविला असताना पुन्हा शेतकरी गोळा झाले तर प्रचंड अनर्थ ओढविण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर काही महिने ठाण मांडलं आहे; मात्र आता तिथे आंदोलन करणाऱ्या अनेकांचा आंदोलनातला रस संपत चालल्याने आंदोलन पुकारलेल्या शेतकरी गटांनी आता राज्याच्या विविध भागांमध्ये ‘फिर दिल्ली चलो’ अशी घोषणा करून
आंदोलकांची संख्या वाढवायचं ठरवलं आहे.संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला 24 एप्रिल रोजी 150 दिवस पूर्ण होत आहेत. त्या दिवसापासून ‘फिर दिल्ली चलो’ अशा नव्या घोषणेसह आंदोलनाला नवी गती दिली जाणार आहे.
दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी ही नवी घोषणा देण्यात आली असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. 10 मे रोजी संघटनेने एक विशेष परिषदही आयोजित केली असून, त्यात देशभरातले शेतकरी नेते सहभागी होणार आहेत.
संयुक्त किसान मोचार्ने यापूर्वी संसदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता; मात्र त्याचा तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्याबद्दलचा निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल, असं संयुक्त किसान मोर्चाकडून सांगण्यात आलं.
पंजाबात सध्या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आपापल्या शेतात कामाला गेले असल्यामुळे दिल्ली सीमेवरच्या आंदोलक शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं.
‘आता कापणीचा हंगाम संपत आला असल्यामुळे ‘फिर दिल्ली चलो’ या मोचार्ने शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनस्थळी आणलं जाईल,’ असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.या आंदोलनात सहभागी असलेल्या बीकेयू (उग्रहण) या शेतकरी गटाने आपल्या सदस्यांना 21 एप्रिलपासून टिकरी बॉर्डरवर जमण्यास सांगितलं आहे.
आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी संघटनांकडून सातत्याने असा दावा केला जात आहे, की आंदोलक शेतकºयांचा उत्साह कायम असून, तो वाढत आहे; मात्र संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी मात्र आंदोलन लांबत चालल्याने थकवा आला असल्याचं मान्य केलं.
‘सरकार सध्या पूर्णपणे कोविडवरच काम करताना दिसतंय आणि त्यांच्याकडून तातडीने काही चर्चा सुरू होईल, असं वाटत नाही. आंदोलन जितकं जास्त लांबेल, तितक्या अधिक शेतकऱ्यांना थकवा जाणवू लागेल,’ असं एका शेतकरी नेत्याने सांगितलं.
हरियाणा सरकारने आवाहन केलं आहे, की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं. कारण हरियाणा आणि पंजाबमध्ये कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे; मात्र शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी सरकार कोविडचा फायदा घेऊन आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
‘त्यांनी गेल्या वषीर्ही हीच क्लृप्ती वापरली होती. या वर्षी आम्ही तसं होऊ देणार नाही,’ असं यादव यांनी सांगितलं.भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कोरोना झाला, तरी चालेल पण घरी जाणार नाही, असा निर्धार केला आहे.
केंद्र सरकारकडून राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दिल्लीच्यी सीमांवरील महामार्गांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे ऑक्सिजन पोहोचण्यास विलंब लागत आहे, असा दावा काही ऑक्सिजन निर्मात्यांनी केला आहे. या दाव्याला राकेश टिकैत यांनी फेटाळून लावला आहे.
ऑक्सिजन निर्मात्यांचा दावा चुकीचा असून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी टिकैत यांनी केली आहे. तसेच येथे आम्ही क्वारंटाइन झालेलो आहोत. आम्ही घरी जाऊ. परंतु, दिल्लीतील रोग घेऊन जाणार नाही. कोरोना झाला, तरी येथील मॅक्स रुग्णालयात उपचार घेऊ, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App